आत्मविश्वासातील कार्य योग्य वळण घेणार?.. — लोकप्रतिनिधी आणि मतदार… — युवा नेते दिवाकर निकुरे आणि त्यांची निश्चित जबाबदारी…!..

 

प्रदीप रामटेके

मुख्य संपादक 

        चिमूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी,”लोकप्रतिनिधी म्हणून,नेतृत्व करण्याची संधी अनेकांना विश्वासपुर्वक दिली..

         नेतृत्वाची गुणवत्ता दाखवून चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रात उधोग आणण्याची जबाबदारी कुणालाच जमली नाही.

           चिमूर विधानसभा क्षेत्रातील गोरगरिबांना,बेरोजगारांना सातत्यपूर्ण रोजगार उपलब्ध करून देण्यासंबंधाने चिमूर – गडचिरोली लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील खासदार व चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील आमदार हे यशस्वी होणार नाहीत असे आजपर्यंतच्या त्यांच्या भुमिकावरुन व कार्यावरुन लक्षात येते आहे.

       (वरील व्हिडिओ मध्ये बघा दिवाकर निकुरे यांच्या कार्याचा आढावा.)     

          यामुळे मानव विकासाच्या हितासाठी ते धडपडतील किंवा पुढे चालून कर्तव्य पार पाडतील याची शाश्वती नाही. 

         ज्या मतदारांच्या मत बलावर खासदार व आमदार होतात,त्यांच्या विकासासाठी त्यांना काही करता येत नसेल तर बाह्य विकासाच्या तुनतुन्यातच मतदारांनी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दिवस काढायचे काय? आणि अशा तुनतुन्याचा काय उपयोग? हा प्रश्न मतदारांपुढे आता आवासुन उभा ठाकला आहे.

          म्हणूनच चिमूर विधानसभा मतदारसंघातील मतदार हे आमदार बदलवण्याच्या मुळमध्ये असल्याचे मन चिन्हे उमटू लागली आहेत.

         आता प्रश्न हा पडतो आहे की,चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातंर्गत पुढील आमदार कोण असणार?ते मतदार वेळेवर ठरवतील..

           मात्र,आतापासून जो व्यक्ती मतदारांचे आर्थिक,श्रमिक,शैक्षणिक,सामाजिक विकासयुक्त हित जपण्यासाठी शतप्रतिशत प्रयत्न करण्यासाठी धडपडेल तोच व्यक्ती मतदारांच्या मनात घर करून असेल व तोच व्यक्ती चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातंर्गत पुढील आमदार असेल..

         भाजपा,काॅंग्रेस पक्ष हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असले तरी चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातंर्गत कुणाला निवडून आणायचे ही त्यांची बंद दरवाज्यातील रननीती असल्यामुळे,”भाजपाचे कार्यकर्ते काॅंग्रेसला सहकार्य करतात तर काॅंग्रेसचे कार्यकर्ते हे भाजपाला सहकार्य करतात,असेच मागील २० वर्षांचे गुपिते समोर आहेत.

           काॅंग्रेसचे युवा नेते दिवाकर निकुरे हे चिमूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातंर्गत सक्रिय होणे म्हणजे माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांचा त्यांना पुर्णपणे आशिर्वाद असणे होय.  

                चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी एखाद्याला मनातून साथ दिली तर त्यांची कृती पुढील व्यक्तीला यशस्वी करण्याची असते.”अर्थात विजयाचा शिकामोर्तब असतो! हे मतदारांनी अनुभवले आहे.

            समाजसेवक दिवाकर निकुरे यांच्या बेधडक बोलण्याच्या कार्यपद्धतीत जो आत्मविश्वास दिसतो आहे तो साधारण नाही हे लक्षात घेतले पाहिजे.कुठलीना कुठली राजकीय शक्ती व मतदार शक्ती त्यांच्या जवळ आहे आणि भावी कार्यासाठी पाठबळासह आशिर्वाद देत आहे,असे एकंदरीत समजायला हरकत नसावी.

             कदाचित दिवाकर निकुरे यांच्या आत्मविश्वासातील कार्ये योग्य वळण घेणार व त्यांना वेळेनुसार निश्चित जबाबदारी अवगत होणार असे त्यांच्या हालचालींवरुन व कार्यावरुन दिसून येते आहे.

          मात्र,चिमूर विधानसभेची निवडणूक लढताना,निवडणूक कार्यकाळात भयंकर वादविवादाला सामोर जात,बऱ्याच चढाओढी अंतर्गत राजकीय प्रवास करावा लागतो हे अनुभवातील चित्र आहे.