शासकीय योजनांची जत्रा,शासन आपल्या दारी,खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीत संपन्न…….

 

दखल न्यूज भारत

विजय शेडमाके

 

दि.१२ मे २०२३

 

गडचिरोली:-या कार्यक्रमाला विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व धनादेश चे वितरित करून या माध्यमातुन विविध योजनांचे स्टाल उपलब्ध केले होते.यानिमित्ताने केंद्र व राज्य शासन आपल्या दारी असून जनतेनी शासकीय विविध योजनांची माहिती घेऊन या महाराजस्व अभियाना लाभ घ्यावा असे आव्हान खासदार अशोक नेते यांनी उदघाटक कार्यक्रमाप्रसंगी केले.

         खासदार अशोकजी नेते यांनी शासन आपल्या दारी, शासकीय योजनांची जत्रा या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करतांना सरकारी योजनेचा उद्देश म्हणजे सर्व नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारने राबविल्या जाणारे योजना होय.त्यामुळे शासनाच्या विविध योजना जनसामान्यपर्यंत पोहचवून लाभ देण्यात यावे. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत.यावेळी केंद्रशासनाच्या विविध योजनाविषयी माहिती उपस्थितांना खासदार महोदयांनी देऊन शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवा असे प्रतिपादन याप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी केले.

           या प्रसंगी प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक नेते,तहसीलदार महेंद्र गणविर साहेब, गटविकास अधिकारी धनंजय साळवे,गटशिक्षणाधिकारी राऊत साहेब, पशुसंवर्धन विस्तार अधिकारी प्रकाश काळे,वैदयकिय अधिकारी डॉ.कुंमरे मॅडम, पोटेगांवचे सरपंच अर्चना ताई सुरपाम,सावेला सरपंच सुरेखा मडावी,मारदा सरपंच मनोहर पोटावी,पोलीस पाटील किशोर नरोटे,मुख्याध्यापक बल्लमवार सर,वनपरिक्षेत्राधिकारी तांबरे, राजोली सरपंच कांता हलामी,सरपंच देविदास मडावी,तसेच शासकीय योजनांची जत्रातील अधिकारी वर्ग व मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते.