पेरणीपूर्व मशागतीची जोमात सुरुवात…

अश्विन बोदेले 

तालुका प्रतिनिधी

 दखल न्यूज भारत

 

आरमोरी:- मे महिना सुरू झाल्यापासूनच खरीपातील आंतर मशागतीच्या कामाला जोमात सुरुवात झालेली आहे. यादरम्यान शेतशिवारातील धूर सध्या निघू लागला असून हा धूर खरिपातील संकेत देऊ लागला आहे . पेरणीपूर्व मशागतीचे काम सुरू आहे. यासाठी शेतातील केरकचरा तसेच धान पिकातील धसकटे नांगरणी करताना अडचणीचे ठरतात. त्यामुळे धुर्‍यावर लावलेले तुर पिकांची खुंटे काढण्याचे काम सध्या सुरू आहे.

खरीपतील पीक लागवडीसाठी ही धसकटे आड येऊ नये म्हणून शेतकरी ही खुंटे उपटून धुरेपारे साफसफाई करीत आहेत. याशिवाय ज्या ठिकाणी धानपरे टाकले जातात त्या भात खाचराची चांगली साफसफाई करावी लागते.

 यासाठी तनस टाकून ती जळली जात आहे. या कामासाठी शेतकरी सकाळी व सायंकाळी शेतात जाऊन आग लावत आहेत. यामुळे शेत शिवारात सर्वत्र धूर निघताना दिसून येत आहे.

 काही शेतकरी गरजेपुरतीच तनिस घरी नेतात व शिल्लक राहिलेले पाळीवर टाकून जाळतात . शेतकऱ्यांकडे पशु कमी प्रमाणात असल्याने बरीचशी तनीस शेतातच शिल्लक असते. याचा उपयोग शेतकरी धुरेपारे जाडण्यासाठी, बांधीमधलं केर कचरा जाळण्यासाठी करतात. सध्या शेत नांगरणी, वखरणीचे काम जोमात सुरू आहे . शेतकऱ्याला आपल्या खरीप हंगामाची लगबग झालेली दिसून येत आहे.