पोलीस महासंचालक सा. यांच्या हस्ते अॅक्सीस बँक एटीएमचे उद्घाटन.

डॉ. जगदीश वेन्नम

    संपादक

            बँक म्हणजे ग्राहकांचे पैसे सांभाळणारी किंवा त्यांना कर्ज देणारी यंत्रणा अशी नागरीकांमध्ये ओळख आहे. यावर उपाय म्हणुन बँकांनी नागरीकांना त्वरीत पैसे काढता येण्यासाठी एटीएमची सोय केलेली आहे. याचाच एक भाग म्हणून  पोलीस महासंचालक म.रा. मुंबई श्री. रजनीश सेठ सा. यांच्या हस्ते आज दिनांक १२/०५/२०२३ रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या परिसरात नागरीकांच्या सोय सुविधेसाठी अॅक्सीस बँक एटीएमचे उद्घाटन पार पडले.

         गडचिरोली पोलीस मुख्यालय परिसराजवळ जिल्हाधिकारी कार्यालय, आरटीओ कार्यालय, जिल्हा परिषद, ट्रेझरी ऑफीस, जिल्हा सत्र न्यायालय इ. विविध शासकिय कार्यालये आहेत. या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच परिसरातील नागरिकांना पैसे काढण्यासाठी अॅक्सीस बँक शाखेचे एकही एटीएम जवळपास नसल्याने तसेच नागरीकांच्या व त्यांच्या खातेधारकांच्या सोय सुविधेसाठी गडचिरोली अॅक्सीस बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. राकेश वल्लालवार यांनी गडचिरोली पोलीस दलाच्या मदतीने पोलीस मुख्यालय परिसरात एटीएमची उभारणी केलेली आहे. या एटीएमचा फायदा जवळपास राहणाऱ्या सर्व नागरीकांना होणार आहे.

          या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी पोलीस महासंचालक स.रा. मुंबई श्री. रजनीश सेठ सा. पोलीस उप महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. संदीप पाटील सा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. यतिश देशमुख सा. तसेच अॅक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक, श्री राकेश राजेंद्र चल्लालवार हे उपस्थित होते.