सार्वत्रिक लोकसभा निवडणुक संबंधाने पोलीस स्टेशन कन्हान येथे रूट मार्च घेण्यात आला…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी

  पारशिवनी:- तालुक्यातील कन्हान पो स्टे तर्फे आज रविवार दिनांक 14/04/ 2024 सांयकाळी 06.00वाजता पासून ते 7/30 वा. पर्यंत श्री उमेश पाटील पोलिस निरिक्षक पोलिस स्टेशन कन्हान यांचा प्रमुख उपस्थितीत सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 या संबंधाने पोलीस स्टेशन कन्हान हद्दीत कन्हान शहरातील विवेकानंद नगर, पिपरी धरम नगर ते आबेडकर चोक ,तारसा रोड , सात नंबर नाका गऊहिवरा चौक गणेश नगर राम नगर हनुमान नगर ते परत गाधी चौक पोलिस स्टेशन पर्यत रूट मार्च घेण्यात आला.

         सदर रूट मार्च मध्ये 05 अधिकारी, 14 RPF .12 अंमलदार, व 1 RCP पथक कन्हान पोलिस स्टेशन चे पोलिस कर्मी सह 26 होमगार्ड सह अनेक पोलीस रूटमार्च मध्या उपस्थित होते. अशी माहिती गोपनिय विभागातिल पोलिस अतिश मानवटकर यानी दिली.