पल्स पोलिओ मोहिमेच्या जनजागृति करिता रैलीचे आयोजन…

  सैय्यद ज़ाकिर

जिल्हा प्रतिनिधि वर्धा 

हिगणघाट :- प्लस पोलिओ लसिकरण मोहिमेच्या प्रचारार्थ गत दी. रैलीचे आयोजन करण्यात आले होते.

         तालुक्यात 0 ते 5 वयोगटातिल एकूण 16982 लाभार्थी असून त्यांना लसिकरण देण्याकरिता हिंगणघाट शहरात 74 बूथ ची व्यवस्था करण्यात आली होती.ग्रामीण विभागात 145 बूथ ची व्यवस्था करण्यात आली.

         सोबत 10 फिरते पथक तैनात केले होते. सर्व बूथ वर प्रशिक्षित मनुष्यबढ़ व पुरेशी लस उपलब्ध करुं न देण्यात आली. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी तालुका प्रशासन कडुन 2 मार्च रोजी 20 24 /डॉ.बाबा साहेब आम्बेडकर चौक ते कारंजा चौक भव्य रैलीचे आयोजन होते.

           रैलीमध्ये डॉ.बाबा साहेब आम्बेडकर विद्यालय,संजय ग़ांधी विद्यालय,भारत विद्यालय, जी बी एम एम मोहता विद्यालय व युवा परिवर्तन नर्सिंग कॉलेज विद्यार्थ्याचा सहयोग घेण्यात आला.

रैली मध्ये डॉ. प्रवीणा मिसार वैधकीय अधिक्षक उपजिल्हा रुगनालय हिंगणघाट यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. रैली करिता डॉ.प्रभाकर नाईक तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

          रैलीचे समापन कारंजा चौक मधेय करण्यात आला. समारोप प्रसंगी पोलिओ लसीचे महत्व सांगण्यात आले. कार्यक्रमाचा यशस्वीते करिता मनोज वरभे, निखिल हेडाऊ ,प्रशांत डोंगड़े,विनोद भगत,सिद्धार्थ बहादे, रीतेश कांबले ,प्रिय लोहकरे, उमेश मेश्राम,पदमा खरसान,यांनी सहकार्य केले.