राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमे अंतर्गत पारशिवनी तालुक्यात 11 हजार 263 बालकांना लसीकरण… —  96% टक्के बालकांनी घेतला पोलिओ लसीकरणाचा लाभ…

 

कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

 

पारशिवनी:- पारशिवनी तालुकातंर्गत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी ठरली असून ९६ टक्के बालकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे.

         प्राथमिक आरोग्य केन्दात दहेगाव जोशी व डोरली केन्द्रांत १००% टक्के, लशीकरण झाले.

प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान  ९९% टक्के,प्राथमिक आरोग्य केन्द्र साटक मध्ये 96% टक्के आणी प्राथमिक आरोग्य केन्द्र नवेगावखैरी येथील केन्द्रात 75% टक्के मुलाचे पोलियो लशीकरण करण्यात आले.

         संपुर्ण पारशिवनी तालुका तील पाच ही आरोग्य केन्द्रातुन एकुण 11 हजार 694 मुलापैकी 11 हजार 263 मुलाना पोलियो लशिकरण डोज पाजण्यात आले असल्याची माहीती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय  माने यांनी दिली.

         सर्व जनतेणी आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना लस पाजून घेण्याविषयी तालुक्यातील 160 बुथ मध्ये 10 हजार 690 आणी मोबाईल टिम यांचे व्दारे 348 मुलाना पोलियो डोज देण्यात आले.असे एकुण 11 हजार 263 म्हणजे 96% टक्के पोलियो लाशिकरण झाल्याची माहीती तालुका वैधारकिय अधिकारी डॉ. संजय माने यानी दिली.

       पारशिवनी तालुकात डॉ.विनोद बिटपल्लीवार साथरोग अधिकारी जिल्हा परिषद नागपूर,श्री.नितीन मून आरोग्य पर्यवेक्षक जिल्हा परिषद नागपूर आणी तालुका वैधकिय अधिकारी तसेच पर्यवेक्षक यांनी पारशिवनी तालुकाचे आरोग्य केन्द उपकेन्द, व बुथ येथे आकस्मिक भेट दिली आणि सर्व केन्द्रातुन माहिती जाणून घेतली.

       सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी डाॅक्टर संजय माने तालुका वैद्यकीय अधिकारी पारशिवनी,डॉ वैशाली हिंगे प्रभारी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान,डॉ.तेजस्विनी गोतमारे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान,डॉक्टर दिप्ती पुसदेकर प्रा.आ.केन्द्र दहेगाव जोशी, डॉ.अरविद खोब्रागडे  वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केन्द नवेगाव खैरी,डॉक्टर राठौड  वैद्यकिय अधिकारी प्रा श.आ.केंन्द्र साटक, डॉक्टर माधवी गावंडे वैद्यकिय अधिकारी प्रा.आ.केंद्र डोरली तसेच तालुक्यातील सर्व  प्राथमिक आरोग्य केन्द्र,उपकेन्द्र,आरोग्य केन्द्र, आशावर्कर अंगणवाडी सेविका व मदतनिस,सर्व आरोग्यसहाय्यक, आरोग्य संहाय्यीका व स्थानिक स्तरावरील सर्व अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका यांनी प्रयत्न केले.