राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत 5 हजार 631 बालकांना लसीकरण.

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

पारशिवनी:- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केन्द्र कन्हान अंतर्गत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम संपन्न झाली असून ५ हजार ६३१ बालकांना लसीकरण करण्यात आले.

        प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली हिंगे यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले होते की,आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील मुलाना पोलियो लस पाजून घ्यावे.कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रा अतर्गत एकुण 54 बूथ मधिल 5834 पैकी5631 मुलाना पोलियो डोज देण्यात आले.

       प्रा.आ.केन्द्र कन्हान येथे डॉ.विनोद बिटपल्लीवार साथरोग अधिकारी जिल्हा परिषद नागपूर,श्री.नितीन मून आरोग्य पर्यवेक्षक जिल्हा परिषद नागपूर यांनी आकस्मिक कन्हान येथील प्रा.आ.केंद्राला भेट दिली आणि सर्व माहिती जाणून घेतली. 

        प्राथमिक आरोग्य केन्द्र कन्हान अर्तगत उपकेंद्र कार्यक्षेत्रात एकुण 54 बुथ,एक मोबाईल बुथ असुन यात 130 कर्मचारी नियुक्त केले होते.आरोग्य केंद्रातील कर्मचारी,आशावर्कर, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिस यानी एकुण 5 हजार 834 मुला पैकी एकुण 5631 लाभार्थी मुलाना पोलियो लस दिल्यात.

       प्रा.आ.केन्द्र कन्हान हद्दीतील या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी डॉ.वैशाली हिंगे प्रभारी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान,डॉ तेजस्विनी गोतमारे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान,श्री.हंसराज ढोके श्रीसज्जनदास धूल,श्री.सुनिल गायकवाड आरोग्यसहाय्यक,श्रीमती माया हरडे आरोग्य संहाय्यीका,श्री. अथर्व बंड,श्री विलास सहारे,यशवंत घोटेकर,हरीदास पराते,गौतम झोडापे आरोग्य सेवक,श्री.महेंद्र सांगोडे,श्री. गौरव भोयर, कु.चंचल,कु.यामिनी,श्रीमती जामणिक,श्रीमती नाईक,श्रीमती हटवार,श्री.आशुतोष नखाते व स्थानिक स्तरावरील सर्व अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका यांनी यशस्वी प्रयत्न केले.