पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला आळंदीमध्ये उस्फूर्त प्रतिसाद…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : पोलिओ आजाराच्या समूळ उच्चाटनासाठी राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आळंदी शहरात आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आळंदीतील विविध 14 ठिकाणी आरोग्य विभाग सेवक अधिकार्‍यांनी रविवारी (दि. 3) दिवसभरात ६ हजारांहून अधिक बालकांना 14 बूथकेंद्र माध्यमातून पोलिओ डोस देण्यात आला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उर्मिला शिंदे यांनी सांगितले.

           आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आयोजन केलेल्या पोलिओ मोहिमेचा प्रारंभ वैद्यकीय अधीक्षक डॉ.उर्मिला शिंदे, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण, भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे, राष्ट्रवादीचे नेते निसार सय्यद, डॉ.सुनिल वाघमारे, शिरीष कारेकर, आनंद वडगावकर , संकेत वाघमारे, राहुल घोलप, आकाश जोशी, ज्ञानेश्वर बनसोडे यांच्या उपस्थित झाला.

          सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिओ डोस देण्याची प्रक्रिया सुरू होती. लसीकरण मोहीम राबविताना संपूर्ण आळंदी व परिसरातील एकाही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये. म्हणून विशेष मोहिम हाती घेतली जाणार आहे.