श्री विठ्ठल वारकरी सेवा संस्थेत सद्गुरू जोग महाराज मुर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा. 

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

आळंदी : येथील श्री विठ्ठल वारकरी सेवा संस्थेत स्वानंद सुखनिवासी सद्गुरू प.पू गुरुवर्य जोग महाराज मुर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व किर्तन महोत्सव होणार आहे, हा महोत्सव शनिवार दि.१३ ते मंगळवार दि.१६ या कालावधीत हभप गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. या महोत्सवात पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ६ ते ९ व दुपारी ३ ते ६ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायं.६ ते ७ हरिपाठ आणि रात्री ७ ते ९ हरिकीर्तन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

          सदर महोत्सवात हभप सुदाम महाराज आदमाने, हभप पद्माकर महाराज पाटोळे, हभप गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत आणि हभप मारुती महाराज कुऱ्हेकर यांच्या सुश्राव्य वाणीतून किर्तन सेवा संपन्न होणार तरी या महोत्सवात उपस्थित राहून पर्माथिक विचारांचा आनंद लुटावा असे आवाहन श्री विठ्ठल वारकरी शिक्षण सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.