युवा काँग्रेस नेते दिवाकरभाऊ निकुरे यांचे कडून आजार ग्रस्तांना आर्थिक मदत…!

प्रमोद राऊत / तालुका प्रतिनिधी 

      आज दि.१२/०५/२०२३ चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड तालुका अंतर्गत गोविंदपूर येथील रहिवासी आकाश महादेव सहारे तसेच खरबी येथील रहिवासी देवानंद लक्ष्मण चौके हे बरेच दिवसांपासून आजारी आहेत.

         परंतु त्यांच्या दोघांच्याही आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी यांची माहिती दिवाकरभाऊ निकुरे यांना दिली आणि दिवाकरभाऊंनी कार्यकर्त्यांच्या हस्ते आज काँग्रेस कार्यालय येथे त्यांना पुढील उपचारासाठी १०,००० रुपयांची आर्थिक मदत केली.

          या वेळेस प्रदेश युवक काँग्रेस सहसचिव नितीन कटारे,गोविंदपूर सरपंचशालुताई हांडेकर, ग्रा.पं.सदस्य अमजदजी शेख, ओबीसी विभाग तालुकाध्यक्ष संजय अगडे, डोनुजी सहारे, लक्ष्मणजी गहाने,युवा काँग्रेस कार्यकर्ते संतोष बोडने,लोकेश मेश्राम, श्रेयस शेनमारे, अक्षय चौधरी, श्याम बागडे, धनंजय ठलाल ई.उपस्थित होते.