पोलीस महासंचालक यांच्या उपस्थितीत पार पडला पोस्टे एटापल्ली येथे भव्य जनजागरण मेळावा व नवीन प्रशासकिय इमारत उद्घाटन सोहळा… — नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्र पिपली बुर्गी येथे दिली भेट.

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

गडचिरोली:-गडचिरोली जिल्हा हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिन जिल्हा असून येथील आदीवासी भागात राहणान्या नागरिकाचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने आज दिनांक १२/०५/२०२३ रोजी पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई श्री. रजनीश सेठ सा. यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने “पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातुन पोलीस स्टेशन एटापल्ली येथे जनजागरण मेळावा तसेच त्यांच्या हस्ते पोस्टे एटापल्ली येथील नविन प्रशासकिय इमारतीचे उदघाटन सोहळा पार पडला.

        सदर कार्यक्रमामध्ये उपविभाग एटापल्ली अंतर्गत पोस्टे एटापल्ली हद्दीतील एकुण १००० च्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. उपस्थित आदीवासी बांधवांना कार्यक्रमस्थळी विविध प्रकारचे साहित्यांचे वाटप करण्यात आले असुन त्यात साडी, धोतर, व्हॉलीबॉल, क्रिकेट बॅट, स्प्रे पंप, नोटबुक, कंपास, बॉलपेन, ब्लॅकेट, ताटपत्री, छत्री, व्हॉलीबॉल नेट, बिस्कीट व चॉकलेट्स इत्यादी साहीत्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मा. पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई श्री. रजनीश सेठ सा. यांनी उपस्थित नागरीकांना संबोधीत करतांना सांगीतले की, पोलीस दलाचे कर्तव्य आहे की, गडचिरोलीतील नागरिकांपर्यंत पोहचून जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळवून द्यावा. त्यासाठी पोलीस नेहमी कटीबद्ध आहेत. दुर्गम भागात काम करणाऱ्या अधिकारी / अंमलदार यांनी आणखी उत्कृष्ट काम करावे, तसेच पोलीस आणि नागरिक यांनी एकजूट होऊन या भागाचा विकास केला पाहीजे. यासोबतच पोलीस महासंचालक म.रा. मुंबई श्री. रजनीश सेठ सा. यांनी काल दिनांक ११/०५/२०२३ रोजी नविन उभारण्यात आलेले पिपली बुर्गी येथिल पोलीस मदत केंद्राला भेट दिली. त्यावेळी पोमकें परिसराची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला व पोमकेला कार्यरत असलेल्या जिल्हा पोलीस, एसआरपीएफ, सीआरपीएफ पोलीस अधिकारी व जवानांचे दरबार घेऊन त्यांचे मनोबल वाढविले. तसेच गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या परिसरात नागरीकांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेल्या अॅक्सीस बँकेच्या एटीएमचे आज दिनांक १२/०५/२०२३ रोजी मा. पोलीस महासंचालक, म. रा. मुंबई यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. सोबत अॅक्सीस बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. राकेश वल्लालवार उपस्थित होते.

         आतापर्यंत गडचिरोली प्रशासनाकडुन पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक ५५१, नर्सिंग असिस्टंट १२३७, हॉस्पिटॅलिटी ३१४, ऑटोमोबाईल २७६, ईलेक्ट्रीशिअन १७६, सेल्समॅन ०५, कंपनी रोजनदारी १५५ प्लंम्बींग ३५, वेल्डींग ३८, जनरल ड्युटी असिस्टंट ३१४, फील्ड ऑफीसर ११ व व्हीएलइ ५२ असे एकुण ३१५५ गडचिरोली जिल्हयातील युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआग आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत व्युटीपार्लर १७४, कुकुट पालन ५६५, बदक पालन १००, शेळी पालन १४२ शिवणकला २७७, मधुमक्षिका पालन ५३, फोटोग्राफी ६५, स्पॉट टाईज ३५, एमएससीआयटी २३१, वाहन चालक ५९२, भाजीपाला लागवड १३९५, पोलीसभरती पूर्व प्रशिक्षण १०६२, टु व्हिलर दुरुस्ती १३४, मत्स्यपालन ८७, वराहपालन १०, फास्ट फुड ९६, पापड लोणचे ५९, कराटे प्रशिक्षण ४८ असे एकुण ५१२५ युवक/युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.

        सदर जनजागरण मेळाव्याच्या कार्यक्रमास पोलीस महासंचालक म.रा. मुंबई श्री. रजनीश सेठ सा. पोलीस उप महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. संदीप पाटील सा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा.,  अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख सा. उपविभागीय अधिकारी, एटापल्ली श्री. शुभम गुप्ता सा., उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली श्री. सुदर्शन राठोड व उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी श्री. बापुराव दडस हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस स्टेशन एटापल्लीचे प्रभारी अधिकारी श्री. विजयानंद पाटील तसेच

नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.