राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
जय भीम पॅंथर बौद्ध समाज कढोली, वार्ड क्रमांक १ यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत गावातील शासकीय सेवेत कार्यरत युवकांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मध्ये कार्यरत शुभम जिडकुंटवार तसेच आरोग्य विभागात कार्य करणारे नरेश इंदूरकर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य पि आर आकरे उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून कढोलीचे उपसरपंच किरणजी आकरे, माजी सरपंच चंद्रकांत चौके, दिलारामजी मानकर, ज्येष्ठ कार्यकर्ते गुणवंत दडमल, आनंदरावजी आकरे, शालिकजी जनबंधू, सेवा सहारे, फाल्गुन चौके, धीरज आकरे, मोहित आकरे ,सुरेश गावतुरे ,भास्कर दडमल, लोमेश कोटांगले गावातील प्रतिष्ठित नागरिक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी चांगदेव फाये, पी आर आकरे ,दिलाराम मानकर ,चंद्रकांत चौके, गुणवंत दडमल, किरण आकरे सह मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय आजाद कलापथक निळा निशान शाखा नवेगाव तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर यांच्यावतीने शाहिर जयाताई बोरकर, सहशाहिर भास्कर केळझर साताबारा ,आदेश खडसे, आकाश खडसे, सोपान खडसे ,युवराज बोरकर यांचा संपूर्ण संच तसेच राष्ट्रीय जनजागृती त्रिगुणी निशाण पार्टी शाखा आळका तालुका कामठी जिल्हा नागपूर यांच्यावतीने शाहीर मारुती मारभते, सहशाहीर शेखर टिचकुले, सोल बंट्या ढेकलजी रामटेके, भीमरावजी दिघोरे, यांच्या संपूर्ण संचात राष्ट्रीय दुय्यम खडा तमाशाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव आकरे यांनी केले. प्रास्ताविक गुड्डू इंदूरकर यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन रोहित आकरे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय भीम पॅथर बौद्ध समाज कढोलीचे अध्यक्ष यश्वनंद इंदूरकर यांच्यासह समर्थ भोयर, राहुल टेंभुर्ण, अशोक सोनटक्के, खुशाल लाडे, कालिदासजी आकरे, वामनजी लोणबले , मधुकरजी चौधरी, रोहित आकरे, अनिल सुरणकर, शुभम टेंभुर्णे, शुभम जिडकुंटवार आकाश गाडगे, अजित ठवरे, दीपक जनबंधू, माधवजी आकरे, बुधाजी इंदुरकर, किशोरजी कोसरे, सचिन इदुरकर, रणवीर इंदुरकर, पुरुषोत्तम लाडे, हेमराज इंदूरकर, तेजरामजी भोंडे, सुधीर निकोडे, गिरिधर श्रीरामे, केवळ कोल्हे तसेच समस्त कढोली गावकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



