त्यागमुर्ती वै.गोविंद महाराज केंद्रे यांच्या चांदीच्या पादुकांचे रविवारी लोकार्पण सोहळा…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

आळंदी : संतभुमी अलंकापुरी नगरीत श्री ज्ञानेश्वरी मंदिराचे प्रवर्तक त्यागमुर्ती वै.हभप गोविंद महाराज केंद्रे यांच्या चांदीच्या पादुकांचे लोकार्पण सोहळा येत्या रविवारी दि.१४ रोजी सकाळी ११ वा. वारकरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष अध्यापक हभप मारुती महाराज कुऱ्हेकर यांच्या हस्ते आणि माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे.

          वै.हभप गोविंद महाराज केंद्रे यांचे उत्तराधिकारी हभप विष्णू महाराज केंद्रे यांचे सुश्राव्य वाणीतून किर्तन सेवा संपन्न होणार आहे. याप्रसंगी गोविंद महाराज केंद्रे संस्थानचे अध्यक्ष तात्यासाहेब केदार-सावंत, सरपंच दादासाहेब काळे,हभप कांताराम काळे, तसेच वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी,साधक वर्ग आणि आळंदीकर ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.