ब्रेकिंग न्युज… युवकाने घेतला गळफास… तुकूम येथील घटना…

धानोरा/भाविक करमनकर

      तुकूम येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज ( ता,१२ एप्रिल) सकाळी साडेअकरा वाजता च्यासुमरास घडली,रमेश मनकेर गावडे वय तीस वर्ष रा, तुकुम तह ,धानोरा असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे, युवकाचे घरी लहान भाऊ व त्याची पत्नी आणि हा युवक राहत होता,याची पत्नी तेलंगणा मधे मिरची तोडायला गेली असल्याचे समजते,त्यातच त्याचा भाऊ घटना घडन्या काही वेळा पूर्वी प्रकृती ठीक नसल्याने तो उपचारासाठी दवाखान्यात पत्नी सोबत गेला होता,घरी कुणी नाहीत हे पाहून त्या युवकाने आपले राहते घरी गळफास घेतले,बाहेर गाऊन आलेले त्याचे मोठे भाऊजी व बहीण हे सुधा आपल्या रिस्तेदारासोबत बाहेर बोलत होते ,घरी कुणी नसल्याचे पाहून त्यांनी गळफास घेतला,घरात काही तरी घडले हे त्याच्या भाऊजी च्यालक्ष्यात आले,लगेच त्यांनी घरात जाऊन पाहतात तर गळफास घेऊन रमेश फाशी लागल्याचे त्यांच्या लक्ष्यात आले लगेच त्यांनी गळफास दोर तोडले,त्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालय धानोरा दाखल केले दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले,मृत व्यक्ती बाबत असेही बोलल्या जात आहे की, सदर युवक हा दारू पिऊन होता,व यापूर्वीही एक दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता गळफास घेतलेल्या युवकाची बहीण व युवकाचा भाऊजी हे संबंधितांना भेटण्यासाठी मीचगाव या गावाहून आलेले होते, भेटण्यासाठी बहीण आली व त्या बहिणीला भावाचेच अंतिम दर्शन करण्याची वेळ आली तर त्याची पत्नी सुद्धा ही मिरची तोडण्यासाठी तेलंगणा येथे गेल्याने जवळपास तीन ते चार दिवसाचा कालावधी परत येण्यासाठी लागतो, पतीच्या अखेरच्या दर्शनासाठी पत्नी सुद्धा उपस्थित राहू शकत नाही, हे सुद्धा तिच्या नशिबी नाहीं, युवकाचे अंत्यसंस्कार त्यांच्या राहत्या गावी तुकुम येथे करण्यात येणार आहे.