खरवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराचे वितरण… महिला व बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान…

    रत्नदिप तंतरपाळे 

चांदूरबाजार तालुका प्रतिनिधी

      चांदूरबाजार तालुक्यातील ग्रामपंचायत खरवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विकास विभागांतर्गत खरवाडी गावातील सामाजिक कार्यकर्ता सौ.ताई विजयराव तंतरपालें व सौ.संगीता अनिल भुरे या दोन कर्तबगार महिलांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार सरपंच मा.प्रतिभाताई बंड यांच्या हस्ते शाल श्रीफळ,सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त गावातील दोन कर्तबगार महिलांचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे आदेश होते .

     त्यानुसार गावातील सामाजिक कार्य करणाऱ्या महिला कडून पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले होते.त्यापैकी सौ .ताई विजयराव तंतरपालें व संगीता अनिल भुरे यांची निवड करण्यात आली.

     याप्रसंगी कार्यक्रमाला सरपंच सौ प्रतिभाताई बंड उपसरपंच सागर शिंगाडे ग्राम पंचायत सदस्य विजयराव तंतरपालें अनिल भाऊ खैरकर,ग्राम पंचायत सदस्या प्रमीलाताई भोवते,कल्यानीताई भुरे,स्वाती ताई मुंदेकार, ग्रामसेवक निलेश भगत, पाटील नारायणराव ढवळे, आशा सेविका सौ.सुनीता चोपडे, अंगणवाडी सेविका जयश्री राऊत, शालू बाई कडू, प्राचि वाकोडे,निलिमा मोंढे,राजेंद्र राऊत,ग्राम पंचायत कर्मचारी संगीता वाकोडे,वंदना टेकाडे उपस्थित होते.