एन.जागतिक मानवाधिकार संघटनेच्या विदर्भ प्रदेश अध्यक्षपदी प्रतिभा खोब्रागडे यांची नियुक्ती… — विदर्भ प्रदेशच्या कार्यकारी अध्यक्षपदी उपक्षम रामटेके सर तर विदर्भ प्रदेश सरचिटणीस पदी पल्लवी बागडे-चहांदे मॅडम..

 दामोधर रामटेके 

कार्यकारी संपादक..

          महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी संवेदनशील व्यक्तीत्व असलेल्या आ‌.प्रतिभा अनिल खोब्रागडे यांची विदर्भ प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

           याचबरोबर आ.उपक्षम रामटेके यांची विदर्भ प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी तर आ.पल्लवी बागडे-चहांदे मॅडम यांची विदर्भ प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे.

        आ.प्रतिभा खोब्रागडे व आ.पल्लवी बागडे-चहांदे यांच्या नावाची सुचना,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आ.मध्यमा मनिष सवाई मॅडम यांनी केली होती तर आ.उपक्षम रामटेके यांच्या नावाची सुचना महाराष्ट्र राज्य सचिव आ.दामोधर रामटेके यांनी केली होती.

          आ.प्रतिभा अनिल खोब्रागडे या विशेष तत्ववेता असून त्यांना समाजसेवेची ओढ आहे.मानवमुल्यांच्या मुलभूत अधिकार-हक्कांना न्याय देण्यासाठी त्या एन.जागतिक मानवाधिकार संघटन भारत च्या माध्यमातून प्रयत्नरत असणार आहेत.त्या विविध संघटनांच्या सन्माननीय पदाधिकारी आहेत.

           तद्वतच विदर्भ प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ.उपक्षम रामटेके आणि आ.पल्लवी बागडे-चहांदे हे सुद्धा समाज सेवेचे कर्तव्य पार पाडीत असून महत्त्वपूर्ण अशा विविध पदांवर कार्यरत आहेत.

          एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.पांडुरंग नरवडे सर आणि राष्ट्रीय महासचिव बुधराव कोटनाके सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात,एन.जागतिक मानवाधिकार संघटन भारत अंतर्गत विविध कार्यकारण्यांची बांधणी सुरू असून,”महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके सर तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा मध्यामा मनिष सवाई मॅडम,संघटनेच्या बांधणी अंतर्गत आपल्या पदाला न्याय देणारे कर्तव्य पार पाडीत आहेत.

          तसेच नवनियुक्त विदर्भ प्रदेश अध्यक्षा प्रतिभा अनिल खोब्रागडे, विदर्भ प्रदेश कार्यकरी अध्यक्ष उपक्षम रामटेके, विदर्भ प्रदेश सचिटणीस पल्लवी बागडे – चहांदे हे आपल्या पदाला कर्तव्यतत्पर करतील अशी अपेक्षा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री.पांडुरंग नरवडे,राष्ट्रीय महासचिव बुधराव कोटनाके, महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मध्यमा मनिष सवाई यांना अपेक्षा आहे.