खासदार ब्रुजभूषण सिहं यांना अटक करा – भूषण सरदार

रत्नदिप तंतरपाळे/चांदूर बाजार तालूका प्रतिनिधी

कुस्ती महासंघाचे मावळते अध्यक्ष व भाजपचे खासदार यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यापासून महिला कुस्तिगीरांचे आंदोलन सुरु आहे. कुस्तिगीर खेळाडू महिलांशी झालेली छेडछाड, त्यांना मिळालेली वागणूक, त्यांच्यावर झालेला अन्याय, अत्याचार याविरोधात आंदोलन सुरु आहे.

स्पर्श करणे,छेडछाड, लैंगिक शोषण व पॉक्सो अंतर्गत ब्रुजभूषण सिहं यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया असे अनेक खेळाडू ब्रुजभूषण सिहं यांच्या विरोधात आंदोलन करत असून ब्रुजभूषण सिहं यांच्यावर अल्पवयीन महिला खेळाडूशी छेडछाड केल्यावरून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

कुस्तिगीर महिला खेळाडून्च्या आंदोलनाला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले असले तरी जशी पाहिजे तशी योग्य ती कार्यवाही ब्रुजभूषण सिहं यांच्याविरोधात झालेली नाही. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असूनही खासदार ब्रुजभूषण सिहं यांना अटक का झाली नाही ? हा महत्वाचा मुद्दा . दिल्ली पोलीस पूढील तपास करत आहे परंतु ब्रुजभूषण सिहं यांना तात्काळ अटक झाली नाही तर महिला खेळाडू व त्यांच्या परिवारावर दबाव आणला जाऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही.

एवढे गंभीर आरोप असतांना, राष्ट्रीय स्वरूपाचे आंदोलन सुरु असतांना व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असताना सुद्धा ब्रुजभूषण सिहं यांना अटक का केली जात नाही ? केंद्र सरकारने व देशाच्या गृहमंत्र्यांनी खासदार ब्रुजभूषण सिहं यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश द्यावे व त्यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी पत्रकारांशी बोलतांना भूषण सरदार यांनी केली.