छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा शिवराज्याभिषेक दिन संपन्न…

 

      रत्नदिप तंतरपाळे

चांदूरबाजार तालुका प्रतिनिधी

      छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा, मंगळवार दिनांक ६ जून २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे ३५० वा शिवराज्याभिषेक दिन संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र इचे, प्रमुख अतिथी मुक्ता निंभोरकर, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री दिनेश वाटाणे, राहुल खाटकर या सर्व मान्यवरांनी सुरुवातीला प्रतिमेची पूजन व हारार्रपण अर्पण केले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.आशिष काळे यांनी सांगितले की, मराठ्यांचा नव्हे तर देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना म्हणजे शिवरायांचा राज्याभिषेक रयतेच्या राज्याची स्थापना करणारे शिवराय ६ जून १६७४ रोजी खऱ्या अर्थाने छत्रपती झाले. केवळ सत्तेसाठी पदासाठी केलेले बंड नव्हतं त्यामागे मराठ्यांच्या सार्वभौम राज्याची स्थापना झाल्याची दवंडी पिटविण्यात आली पण पाचही शाहिच्या दिल्ली शहरांच्या छाताडावर पाय ठेवून रयतेचे स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवरायांना आपण छत्रपती झालो हे सांगण्याची गरज काय होती, रयत मावळे आणि सहकारी जिवापाड प्रेम करत असताना शिवरायांना त्यासाठी राज्याभिषेक केला,असे प्रतिपादन केले.

          या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र इचे या प्रसंगी म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता ही निजामशाही आदिलशाही कुतुबशाही आणि मोगलशाहिच्या घोड्यांच्या टपा खाली चिरडत जात होती. इथल्या रयतेवर अत्याचार होत होता दिवसा ढवळ्या आया बहिणींची अब्रू लुटली जायची आणि विशेष म्हणजे या जुलमामध्ये अप्त्यस्वकीय मराठा सरदारांचा समावेश असायचा हे सर्व समोर असताना शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली रयतेचे राज्य आणलं बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींना शिवबा आपले वाटायचे. राज्याभिषेक करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे इतर राज्याकडून मिळण्यासाठी राज मान्यता त्यामुळे शिवरायांच्या वट हुकूमाना त्यांच्या निर्णयाला कायदेशीर मान्यता मिळणार होती. इतर राज्याशी तह किंवा वाटाघाटी करताना संवाद साधताना मान्यता मिळणार होती रयतेच्या धर्मासाठी काम करत असूनही त्यांना बंडखोर म्हटले जायचे मराठा सरदार हे स्वतःता आदिलशहा औरंगजेबाचे निष्ठावंत सेवक मानायचे, मात्र शिवरायांच्या कामाला मान्यता द्यायचे नाही नेमके हेच बदलण्यासाठी बदलण्यासाठी शिवरायांनी राज्यभिषेक करण्याचा निर्णय घेतला वयाच्या १६ व्या वर्षी २६एप्रिल १६४५ रोजी शिवरायांनी आपल्या सवंगड्यासह राजेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली होती त्यानंतर ३० वर्षांच्या धगधग त्या संघर्षानंतर ६जून १६७४ रोजी शिवरायांनी राज्याभिषेक करून घेतला आणि स्वतःला छत्रपती म्हणून घोषित केले. आजा क्रांतिकारी घटनेला ३५० वर्षे पूर्ण होत आहे, साडेतीनशे वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचा दुर्गामी परिणाम आजही होत असल्याचे जाणवते असे प्रतिपादन केले.

        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक धाकडे आभार अतुल सोळंके यांनी केले या कार्यक्रमाला श्री अविनाश कडू, रोहित कैतवास व रासेयो चे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.