शहरात इष्टदेव झूलेलाल महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा…

      राकेश चव्हाण

 कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

           पूज्य सिंधी पंचायत कूरखेडा यांच्या वतीने येथील फव्वारा चौकात इष्टदेव झूलेलाल महाराज यांचा प्रकट दिन आज दि १० एप्रील बूधवार रोजी विविध कार्यक्रमानी उत्सवात साजरा करण्यात आला.

         यावेळी इष्टदेव झूलेलाल महाराज यांचा प्रतिमेची विधीवत पूजा व आरती करण्यात आली. महाप्रसादाचे वितरण बाजारपेठेत करण्यात आले.  सांयकाळी पूज्य सिंधी पंचायत यांचा वतीने गांधी चौक कूरखेडा येथून झूलेलाल महाराज यांचा प्रतिमेची शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे.

          याप्रसंगी पूज्य सिंधी पंचायतचे मूखीया माधवदास निरंकारी, राजकूमार जिवाणी, राजकूमार रामचंदानी,भागचंद, टहलानी,जोतूमल माखीजा,विष्णू तख्तानी,नानक कूकरेजा,गोपाल वरलानी,छमनदास माखीजा,धरमदास रामचंदानी,राजेश जेठानी,अशोक माखीजा,विवेक निरंकारी, विक्की जिवाणी, रोहित मनूजा,सागर निरंकारी,अनिल सचदेव,लखन रामचंदानी,संकेत मनूजा,आशू रामचंदानी,साहील वरलानी, नितेश निरंकारी, दिनेश रामचंदानी, तूषार टहलानी,दूर्गेश रामचंदानी, रितेश मनूजा आकाश वरलानी,शूभनीत निरंकारी,देव केशवानी,सूजल वरलानी,अंश रामचंदानी,जयंत मनूजा,क्रीश जेठानी,रोशन छाबरा विनू तक्तानी,दिपेश तक्तानी तसेच सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थीत होते.

            यावेळी सिंधी पंचायतचा वतीने येथील सामाजिक कार्यकर्ते रविन्द्र गोटेफोडे पत्रकार सिराज पठान व राकेश चव्हाण यांचा टावेल परिधान करीत सत्कार करण्यात आला.