चिमूर येथे 12 एप्रिल ला एड.प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा.. — यानंतर गोंदिया आणि भंडारा येथे सभा.‌. — माजी मंत्री डॉ.रमेशकुमार गजभे यांचे जनतेला हजर राहण्याचे आवाहन..

      रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

          वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड.बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांची चिमूर येथे भव्य जाहीर सभा” “अभ्यंकर मैदान किल्ला चिमूर”येथे सकाळी 11.00 वाजता होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे गडचिरोली-चिमूर लोकसभेचे उमेदवार प्रा हितेश मडावी यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे.

          या सभेला राज्याचे उपाध्यक्ष प्रदेश प्रवक्ते एड.प्रियदर्शी तेलंग,महा प्रदेश सदस्य कुशल मेश्राम,विदर्भ समन्व्यक अरविंद सांडेकर, भगवानभाऊ भोंडे आदी प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

         वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ प्रमुख तथा माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजभे यांनी गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रातील जनतेला जास्तीत-जास्त संख्येने सभेला हजर राहण्याचे आवाहन केले आहे.

       यावेळी युवा जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे,तालुका अध्यक्ष डॉ. बाळासाहेब बनसोड,कांबळे सर,लालाजी मेश्राम,स्नेहदीप खोब्रागडे,अश्विन मेश्राम,शालिक थुल,राजू घोनमोडे आदी उपस्थित होते.

       चिमूरची सभा झाल्यानंतर गोंदिया व भंडारा येथे प्रचार सभा होणार आहेत.