दोनदा निवडणूकीच्या पराभवानंतर अखेर पोटनिवडणूकीत विवेक रामटेके विजयी… — माजी जि प सदस्य गजानन बुटके यांनी केले अभिनंदन…

      रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी 

        चिमुर :-

      मागील दोनदा पंचवार्षिक निवडणूकीत फक्त एका मतांनी पराभव पत्कारलेल्या एका उमेदवाराने यावेळी पोटनिवडणुकीत नऊ मतांनी विजय मिळविला ही घटना चिमूर तालुक्यातील वडसी येथील आहे. दरम्यान ग्राम पंचायत सदस्यांच्या निधनानंतर सहा महिन्याने झालेल्या पोटनिवडणूकीत विवेक रामटेके विजयी झाले आहेत.

           चिमूर तालुक्यातील वडसी येथील एका सदस्याचे निधन झाल्याने ती जागा रिक्त् झाली होती. त्यामुळे दोनदा पंचवार्षिक निवडणुकीत फक्त एका – एका मताने पराभव झालेले विवेक रामटेक हे ह्या जागेवर तिसऱ्यांदा उभे झाले होते. त्यामुळे ह्या पोटनिवडणूकीकडे अख्या तालुक्याचे लक्ष लागले होते. दोन्ही उमेदवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. दोन्ही उमेदवारांचा घटनाक्रम मजेदार आहे. वडसी येथील रहिवासी असलेले विवेक रामटेके हे मागील दोन ग्राम पंचायत पंचवार्षिक निवडणुकीत उभे राहिले परंतु त्याचे प्रतिस्पर्धी भास्कर मेश्राम यांनी त्यांचा दोन्ही निवडणुकीत फक्त एक मतांनी पराभव केला होता.

         त्यानंतर भास्कर मेश्राम यांच्या निधनाने वार्ड नंबर 3 मधील सदस्य जागा रिक्त झाली. त्यानंतर सहा महिन्यानंतर पोटनिवडणुक रविवार ला पार पडली. विवेक रामटेके यांच्या तिसऱ्यांदा निवडणूकीत उभे राहिल्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी भास्कर मेश्राम यांचे मोठे बंधू भक्तदास मेश्राम यांनी उमेदवारी अर्ज भरला. दोन्ही उमेदवारांसाठी ही निवडणूक ही प्रतिष्ठेची ठरली होती. सोमवार ला मतमोजणीत विवेक रामटेके यांनी घवघवीत तिसऱ्यांदा विजय मिळविला. दरम्यान मतमोजनी केंद्रावर माजी जि प सदस्य गजानन बुटके यांनी विवेक रामटेके यांचे अभिनंदन करत पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

     वडसी गावातील वार्डात 195 मतदान होते . विवेक रामटेके यांना 86 तर भक्तदास मेश्राम यांना 77 मतें मिळाली. 3 मते नोटाला मिळाली. विवेक रामटेके यांचा तिसऱ्यावेळी पराभवाचा वनवास संपल्याने बॅंडच्या तालावर वडसी गावात विजयी मिरवणूक काढण्यात आली.