बोडधा अर्भक मृत्यू प्रकरणी भिसी पोलिसांनी केली आरोपीस अटक.. — जन्म देणारी आई होती अल्पवयीन मुलगी..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

        वृत्त संपादीका

              चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा बोडधा येथे १ नोव्हेंबरला एक नवजात अर्भक नाली मध्ये हेमृतावस्थेत आढळले होते.या प्रकरणी मर्ग नुसार गुन्हा दाखल करुन भिसी पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरली व गोपनीय माहिती घेणे सुरू केले होते.

        तर्कवितर्का नंतर बोडधा गावात स्थानिक ठिकाणच्या व्यक्तींनी अर्भकाला नालीत फेकून दिले असावे असा अंदाज गावातील नागरिकांना आला नव्हता.

       मात्र,तपासाची कायदेशीर प्रक्रिया जेव्हा जलदगतीने सुरू होते तेव्हा आरोपी हा जाळ्यात केव्हा ना केव्हा लटकतोच हे वास्तव आहे.

              वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भिसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद राऊत यांनी उपनिरीक्षक सचिन जंगम,बिट जमादार अमोल नवघरे व इतर सहकारी यांची चमू तयार करून मृत्य अर्भक प्रकरणाच्या चौकशीचे चक्र वेगाने फिरविले तेव्हा नवजात अर्भकाला जन्म देणारी माता ही बोडधा येथीलच असल्याचे पुढे आले व यानंतर सदर मातेला ताब्यात घेतले.

             नवजात अर्भकाला जन्म देणारी माता ही अल्पवयीन असल्याने भिसी पोलिसांनी तीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता सर्व घटनाक्रम कथन केला.

            अल्पवयीन मातेच्या माहिती वरुन आरोपी मोहीत मोहनलाल नागोसे वय २१ वर्ष यास भिसी पोलिसांनी अटक करुन त्याच्यावर भादंवी ३७६, पेस्को सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल  केला.

           अर्भकाला जन्म देऊन मारणाऱ्या दोघांचीही मेडिकल तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

            नवजात अर्भकाला नालीत फेकणाऱ्यां व मारणाऱ्या निर्दयी आरोपींना अटक करुन गंभीर प्रकरणाचा उलगडा केल्यामुळे भिसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद राऊत,उपनिरीक्षक सचिन जंगम,बिट जमादार अमोल नवघरे व त्यांच्या चमूतील सर्व सहकाऱ्यांचे,”भिसी पोलिस स्टेशन अंतर्गत जनता मनस्वी कौतुक करीत आहे…