ग्रामपंचायत निवडणुका म्हणजे राजकीय पक्षांची शक्ती नाही..

 

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

        वृत्त संपादीका

           ग्रामपंचायत निवडणुका अंतर्गत जातीचे राजकारण खूप प्रभावी ठरतय.याचबरोबर गावातील नागरिकांकडून उमेदवारांच्या योग्यतेला किंवा पॅनल प्रमुखांच्या विश्वासाहर्तेला बघितले जाते,तपासले जाते.यामुळे ग्रामपंचायत निवडणुका म्हणजे राजकीय पक्षांची शक्ती नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

           ग्रामपंचायतची धुरा कुणाकडे द्यायची व त्यांच्याकडे ग्रामपंचायतीची धुरा दिल्या नंतर ते गावातील नागरिकांच्या अपेक्षांवर खरे उतरतील काय?त्यांचे कामे संवेदनशील मनाने व कृतीने करतील काय? विकासात्मक व सामान्य फंड निधीचा विनियोग योग्य प्रकारे करतील काय?याचा सारासार विचार करून ग्रामपंचायत निवडणुका अंतर्गत उमेदवार निवडून देण्यावर ग्रामीण भागातील नागरिकांचा भर असतो.या निवडणुका अंतर्गत जातीच्या राजकारणाचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात असतो हे तितकेच खरे आहे.

           मात्र,ग्रामपंचायत निवडणुका अंतर्गत निवडून येणारे उमेदवार हे कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या विचारधारेला मानणारे असतात व सदर निवडून येणारे उमेदवार एखाद्या पक्षालाही मानणारे असतात‌.याचा अर्थ असा नाही की गावातील नागरिकांनी पक्ष पाहून ग्रामपंचायत निवडणुका अंतर्गत उमेदवारांना निवडून दिले आहे.

        म्हणूनच महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका म्हणजे राजकीय पक्षांची शक्ती आहे असे होत नाही.