दिघोरीतून प्रथम झाली सुरू अभिकर्ता प्रवेश भरती मोहीम… — साकोलीच्या पुजा कुरंजेकर यांचा भारतीय आयुर्विमेत ग्रामीणांना प्राधान्य देण्याचा उपक्रम…

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

साकोली : भारतीय आयुर्विमा महामंडळातील साकोली शाखाअंतर्गत जीवन विमा अभिकर्ता प्रवेश भरती सुरू आहे. यामध्ये साकोली शाखेत कार्यरत (सी एल आय ए) पुजा नरेश कुरंजेकर यांनी अभिकर्ता भरती मोहिम सुरु केली आहे. याची सुरूवात ७ जुलै पासून सर्वात प्रथम मोठी/दिघोरी तह. लाखांदूर या ठिकाणाहून अभियानाची सुरुवात केली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना, पुरूषांना आणि त्यांच्या पाल्यांना जास्तीत जास्त भारतीय आयुर्विमा महामंडळातील विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी त्या सदैव प्रयत्नशील आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील लोकांना विमा क्षेत्रात अभिकर्ता म्हणून सहभागी होण्याचेही आव्हान केले आहे. यानंतर साकोली शाखा अंतर्गत क्षेत्रातील साकोली, लाखनी, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी, देवरी, लाखांदूर या सर्व ६ तहसील मध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जीवन विमा क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी संपर्क साधावा असे आवाहन साकोली शाखेत कार्यरत (सी. एल. आय.ए.) पुजा नरेश कुरंजेकर यांनी केले आहे.