कर्मभूमीतील उपजिल्हा रुग्णालयात बिस्किट व फळांचे वाटप… — माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या वाढदिवसाचा उत्साह…

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

अहेरी : गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कांकडलवार यांनी आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात, किंबहुना अहेरी उपविभागात खऱ्या अर्थाने विकासाची मशाल पेटवली. अहेरी ही त्यांची कर्मभूमी. त्यामुळे या कर्मभूमीतील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्यकर्त्यांनी बिस्किट आणि फळांचे वाटप केले.विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त कौटुंबिक सदस्यांसोबत वेळ न घालवता कंकडालवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाच कुटुंबातील सदस्य माणून त्यांच्यासोबत विविध कार्यक्रमात व्यस्त राहणे पसंत केले. अहेरी येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात दररोज अनेक लोक विविध कामे घेऊन येतात. त्यांची ती कामे करण्यात सदैव व्यस्त राहणाऱ्या अजयभाऊंना वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांनी गर्दी केली होती.ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशी विविध पदे भूषविताना अजय कंकडालवार यांनी जमविलेला कार्यकर्त्यांचा गोतावळा किती मोठा आहे हे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिसून आले.

        उपजिल्हा रुग्णालयातील कार्यक्रमाप्रसंगी अहेरी नगर पंचायतीच्या अध्यक्ष रोजा करपेत, उपाध्यक्ष शैलेंद्र पटवर्धन, बांधकाम सभापती नौरास शेख, बालकल्याण सभापती मीना ओंडरे, नगरसेविका सुरेखा गोडसेलवार, नगरसेविका ज्योती सडमेक, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, विलास सिडाम, नगरसेवक महेश बकेवार, नगरसेवक विलास गलबले, माजी नगरसेविका ममता पटवर्धन, कुमार गुरनुले यांच्यासह आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.