समर्थ महाविद्यालय येथे अविनाश धर्माधिकारी यांचे आज व्याख्यान..

चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी 

           स्थानिक समर्थ महाविद्यालय येथे आज दिनांक 7 जुलै 2023 रोज शुक्रवारला सायंकाळी 6 वाजता चाणक्य परिवार, फोरच्युन फाऊंडेशन आणि राष्ट्रीय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर चाणक्य मंडळ परिवार, पुणे येथील अविनाश धर्माधिकारी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

         या कार्यक्रमाचे संयोजक माजी पालकमंत्री डॉ परिणय फूके व कार्यक्रम संकल्पना माजी विधानपरिषद सदस्य प्रा अनिल सोले यांची असून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षाकडे वळले पाहिजे या हेतूने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर, माजी आमदार बाळाभाऊ काशिवार, शिवराम गिऱ्हेपूंजे, माजी विक्रीकर उपायुक्त प्रकाश बाळबुधे राहणार असून कार्यक्रमाला जास्तीत जास्त विद्यार्थी पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे यांनी केले आहे.