“मरणे मंजूर आहे,घाबरणे मंजूर नाही.- आप खासदार संजय सिंग… — नाहक व अती अत्याचार करणेवाल्यांचा देशात दारुन पराभव होत आहे.. — खा.संजय सिंग यांच्या घरी काहीच मिळाले नाही,यानंतरही ईडिने केली अटक…

 

प्रदीप रामटेके 

मुख्य संपादक

         आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजयसिंग यांच्या दिल्ली स्थित राहत्या घरी प्रवर्तन निदेशालयच्या टिमने काल सकाळी जाऊन दिल्ली दारु घोटाळा संबंधाने त्यांच्या निवासस्थानाची कसून दिवसभर झाडाझडती घेतली‌‌ व त्यांना अनेक प्रश्न विचारुन उत्तरे नोंदविली.

     त्यांच्या घराची झडती घेतल्यानंतर सुध्दा दिल्ली सरकारच्या दारू घोटाळा प्रकरणी ते सहभागी असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांना दस्तावेजातंर्गत कुठलेच पुरावे भेटले नसल्यासंबंधाचा व्हिडिओक्लिप सार्वजनिक करीत खासदार संजयसिंग यांनी देशातील नागरिकांना अवगत करुन दिले.

           याचबरोबर दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी संबंधाने कुठल्याही प्रकारचा पुरावा भेटला नसताना त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली असल्याचे सांगितले आहे आणि देशातील नागरिकांसमोर वैचारिक भावना व्यक्त करताना त्यांनी म्हटले आहे की,”मरणे मंजूर आहे,घाबरणे मंजूर नाही,..‌.

            परत त्यांनी आपले मनोगत सार्वजनिक करताना सांगितले आहे की,विरोधकांवर अती अत्याचार करणेवाले व नाहक त्रास देणेवाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भेकड आहेत.

         इतर पक्षातील त्यांचे सत्ता समर्थक भ्रष्टाचारी असल्याचे तेच बोलत असताना आणि उद्योगपती गौतम अडाणी भ्रष्टाचारी असल्याचे पुरावे समोर असताना त्यांच्यावर चौकशा लावून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कारवाई करीत नाही आणि त्यांना अटक करीत नाही.तद्वतच त्यांच्या केंद्र सत्ता काळात खरबो रुपयांचा भ्रष्ट्राचार झाला असतांना यावर ते भाष्य करीत नाही आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील गुन्हेगार मंत्र्यांना,अधिकाऱ्यांना संरक्षण देतात.

        मात्र भ्रष्ट्राचार उघड करणाऱ्या विरोधक खासदार,आमदार लोकप्रतिनीधींवर,विरोधक पक्ष प्रमुखांवर आणि अनेक प्रकरणांची व घटनाक्रमांची वास्तव्य माहिती संकलन करुन केंद्र सरकारची अनागोंदी प्रकरणे देशातील नागरिकांसमोर उघड करणाऱ्या पत्रकारांवर ईडीच्या धाडी टाकल्या जातात,त्यांच्यावर पोलीसांद्वारे कारवाई केली जात असल्याचे सुध्दा खासदार संजयसिग यांनी पुराव्यासह अनेकदा म्हटले आहे.

         २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाचा व त्यांना समर्थन देणेवाल्या सहकारी पक्षांचा दारुन पराभव होत असल्याने,केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ईडी,सिबिआय यांच्या द्वारा येनकेन प्रकारे विरोधकांना अयोग्य प्रकरणात लटकवून अटक करणे,त्यांची नाहक बदनामी करणे,त्यांना अती त्रास देणे संबंधाचा प्रकार केंद्र सरकार द्वारा सुरु झाला आहे असेही खासदार संजयसिग यांनी म्हटले आहे.

            दिल्ली सरकार दारू घोटाळा बोगस असल्याचे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष व दिल्ली प्रदेशचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनेकदा पत्रकार परिषदेत सांगीतले आहे.असे असले तरी २०२० ला प्रवर्तन निदेशालयाच्या संबंधित चौकशी अधिकाऱ्यांनी दिल्ली दारू घोटाळा संबंधाने जी चार्जशीट कोर्टात दाखल केली होती त्या चार्जशीट मध्ये खासदार संजयसिंग यांचे नाव नमूद केले होते.

      यावर बराच आगडोंब राजकीय क्षेत्रातंर्गत देशात झाल्यानंतर आपद्वारा पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आले होते की खासदार संजयसिंग यांच्या संबंधाने केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संबंधितांनी माफी मागितली आहे.

          मात्र,वर्ष २०२-२०२२ च्या नवीन उत्पादन शुल्क धोरणाच्या अमलबजावणीत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने दिल्लीचे तात्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली होती आजच्या स्थितीत ते कारागृहात आहेत.

          पुरावे नष्ट करणे,हिशोब चुकविणे,भ्रष्टाचार करणे,अवाजवी पैसे देणे व घेणे असे आरोप त्यांच्यावर आहेत.