ओबीसी प्रवर्गातील कुणबी समाज संघटना तालुका कोरची तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा… — ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला समाविष्ट करू नका…

ऋषी सहारे

संपादक

     आरमोरी तालुक्यातील कुणबी समाज संघटना तालुका आरमोरी च्या वतीने दिनांक 5 ऑक्टोबर ला गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील ओबीसी च्या आरक्षणात मराठा जातीचा व समाजाचा समावेश करू नये .मराठा समाजाला ओबीसींच्या तुटपुंज्या कोट्यातून आरक्षण देऊ नये या मागण्या घेऊन सदर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. 

            महाराष्ट्रातील मराठा समाजाला व मराठामधून कुणबी दाखले देण्यात आलेल्यांना ओबीसींच्या तुटपुंज्या कोट्यातून आरक्षण देऊ नये असे सरकारचे लेखी आश्वासन मिळण्यात यावे. सद्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत सर्व ओबीसीमध्ये असंतोष पसरला असून त्यास शासन निर्णय जबाबदार आहेत. निजामशाहिच्या दस्तनुसार मराठा समाजास कुणबीमध्ये परिवर्तीत करून ओबीसी कोट्यातूनच त्यांना आरक्षण देण्याबाबत सरकारने जी समिती बनविली आहे त्यास ओबीसी बांधवांच्या विरोध आहे. २००४ चा मराठा – कुणबी, कुणबी – मराठा हि संज्ञा वापरून सरसकट सर्व मराठा समाज निव्वड राजकीय फायदे मिळावे यासाठीच दबाव आणत आहे. किंबहूना सरकारमध्ये प्राबल्य असलेले राजकारणी देखील त्यास अंतर्गत खतपाणी घालत आहेत. या सर्व बाबीचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. 

          महाराष्ट्रात ५६% पेक्षा जास्त असलेल्या ओबीसी समाजाला अवघे २७% सद्या आरक्षण मिळत असले तरी त्यातील ११% विशेष प्रवर्गाना वगळता उर्वरित फक्त १६% आरक्षणामध्ये इतर ओबीसींच्या ४०० पेक्षा जास्त जाती यामध्ये येतात. त्यातही क्रिमीलेअरची जाचक अट घालून ओबीसीवर जाणूनबुजून अन्याय सुरूच आहे. असे असून त्यात भरीसभर म्हणून ३२% मराठा समाजाला १६% आरक्षण ओबीसी कोट्यातून महाराष्ट्र शासनाने देऊ केल्यास ओबीसीना आरक्षणच शिल्लक राहणार नाही. मग जर का ओबीसीमध्ये १६% मराठा आरक्षणाचा समावेश केला तर ओबीसीना शून्य टक्के आरक्षण देणार का? हा खरा प्रश्न आहे. 

           मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने ११ आयएएस-आयपीएस सदस्यांची समिती नेमली आहे.त्यास आमचा तीव्र विरोध असून त्याचा आम्ही निषेधही करत आहोत.अशा समिती नेमल्यापेक्षा राज्यातील सर्व जातींची जातनिहाय जनगणना करण्याची आमचीच नव्हे तर अनेकांची मागणी आहे. त्यानुसार राज्य/ केंद्र सरकारने “जातनिहाय जनगणना” करावी व आरक्षणाची जी ५०% ची मर्यादा आहे ती वाढवून प्रत्यक्ष त्या-त्या जातींच्या संख्येनुसार आरक्षण वाढविण्यासाठी लोकसभेमधे अतिरिक्त आरक्षणाचे बील मंजूर करून घ्यावे जेणेकरून अनेक वर्षांपासूनचा जाती जातीमधे तेढ निर्माण करणारा व सततचे डोकेदुखी ठरणार्‍या आंदोलनाचा यक्ष प्रश्नच निकाली काढता येईल. 

        आजमितीस ५६% ओबीसी असून सुद्धा निव्वळ १६% वर आमची बोळवण केलेली असल्यामुळे आम्ही आरक्षण वाढवून मिळावे यासाठी सततची आंदोलने करत असतांना राज्य व केंद्र सरकार आमच्या जातनिहाय जनगणना व इतर मागण्यांकडे जाणूनबूजून दुर्लक्ष करत आहे असा आमचा ठाम समज आहे.

              मराठा आरक्षणाबाबत ओबीसींची नेहमीच सकारात्मक भूमिका राहीली आहे उलटपक्षी आमच्यासह सर्व ओबीसीं समाजाने स्पष्ट भूमिका घेतली आहे की,मराठा समाजास फक्त १६% काय त्यापेक्षा जास्त आरक्षण दिले तरी चालेल पण त्यांचे आरक्षणासाठी आमच्या आरक्षणास धक्का न लावता लोकसभेमधून आजमितीस असलेल्या आरक्षणा व्यतिरिक्त वेगळ्या अतिरिक्त संख्येचे(%) आरक्षण बील मंजूर करून घ्यावे..त्यास आम्हा सर्व ओबीसींचा पाठींबाच असेल.

तसेच या पत्राद्वारे राज्य सरकार व सर्व पक्षांना आम्ही जाहीर ताकीद देत आहोत की, त्यांनीएकच्या जोपर्यंत केंद्रसरकार वर नमूद केल्याप्रमाणे जातनिहाय जनगणना करत नाही. तोपर्यंत सद्या ओबीसींना मिळत असलेल्या १६% एवढ्या तुटपुंज्या आरक्षणामधे (सद्या सूरू असलेल्या आंदोलनासह) मराठा समाजाचा वा त्या व्यतिरिक्त कोणत्याही जातीचा समावेश करू नये असे सुचित करीत आहोत.

         सुचित करुनही जर सरकार (आंदोलनास बळी पडल्यास) मराठा समाजाचाउमलून ओबीसी आरक्षणामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न केल्यास वा वक्तव्य किंवा कृत्य करण्याचा घाट घातल्यास त्याविरुद्ध आम्ही सर्व ओबीसी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनांसह समाजातील प्रत्येक घटक मरणांतीक उपोषण करेल व त्यास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल याची नोंद सरकारसह सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी घ्यावी असे आपणांस सूचित करीत आहोत.

      मुख्यमंत्री यांनी मागे अनेक वृत्तवाहीनींना मुलाखत देतांना घोषणा केली की “मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही” आपण केलेल्या या घोषणेबद्दल प्रथमदर्शनी जरी ओबीसी सुखावला असला तरी आमची मागणी आहे की सदर घोषणा आपण लेखी स्वरुपात द्यावी जेणेकरुन आमचा सरकारबाबतचा विश्वास दृढ होण्यास मदत होईल..!  

          या मोर्चाचे नेतृत्व कुणबी समाज संघटना कोरची‌ चे मधुकर नखाते , बंडुभाऊ ढोरे‌ , नाशिक नागमोती , प्रा.संजय दोनाडकर, प्रा. प्रकाश बांडे, राष्ट्रपाल नखाते,गुडूभाऊ आठवले,शिवा माकळे,लोकमान्य दोनाडकर, विनोदाने प्रा.प्रदिप चापले, प्रा. राजु ठाकरे,डि.आर.ढोरे,सुधाकर,दोनाडकर, अनिल वाढई, गोविंद दरवडे, अमित गृरव, केशव मोहूले,मधुकर शेन्डे, अशोक गावतुरे, डॉ. नरेश देशमुख, आर.एस.रोटके,कृष्णाजी कावळे,सुभाष धुवारीया,छत्रपती बांगरे व मोठया प्रमाणात तालुक्यातील कुणबी व ओबीसी समाज बांधव उपस्थित राहतील .