राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन…

 

पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी

दखल न्यूज भारत

देसाईगंज :-

          द महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन बॉल बॅडमिंटन असोसिएशन गडचिरोली यांच्या वतीने व आ. कृष्णा गजबे यांच्या सौजन्याने ४२ वी सब ज्युनीयर राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन दि. ५ ते ८ ऑक्टोंबर २०२३ ला स्थानिक तालुका क्रिडा संकुल येथे करण्यात आलेले आहे.

            या स्पर्धेचे उद्घाटन दि. ६ ऑक्टोंबर २०२३ ला सायं. ५ वा. आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात येणार असून अध्यक्षस्थानी तहसिलदार देसाईगंज राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, जिल्हा क्रिडा अधिकारी प्रशांत दोंदल, पोलिस निरीक्षक किरण रासकर, मुख्याधिकारी कुलभुषण रामटेके, व महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पी. के. पटेल, कार्याध्यक्ष डी. एस. गोसावी, खजिनदार विजय पळसकर, बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ एशियाचे महासचिव वाय. राजाराव, आट्यापाट्या फेडरेशनचे चे महासचिव प्रदिप तळवेळकर, मिनी गोल्फ फेडरेशनचे महासचिव डॉ. सुरजसिंह येवतीकर, द. महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे महासचिव अतुल इंगळे. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त निरीक्षक राजेंद्र भांडारकर, स्पर्धा कमिटी अध्यक्ष राजेंद्र खंगार, भाजपा लोकसभा समन्वयक किसन नागदेवे, भाजपा जिल्हाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजु जेठानी, भाजपा तालुकाध्यक्ष/ग्रामीण सुनिल पारधी, भाजपा तालुका अध्यक्ष/शहर सचिन खरकाटे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शालुताई दंडवते, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रमाकांत ठेंगरी, आमगावचे माजी उपसरपंच योगेश नागतोडे आदी उपस्थित राहणार आहेत.

             या कार्यक्रमाचे बक्षिस वितरण दि. ८ ऑक्टोंबरला दुपारी १.०० वाजता होणार अध्यक्ष बक्षिस वितरणाला आ.कृष्णा गजबे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रचित सावकार पोरेड्डीवार, डॉ.पी.के. पटेल, डी. एस. गोसावी. अतुल इंगळे यांच्या बक्षिस वितरण करण्यात येणार असून स्पर्धेत खेळाडूंचा उत्साह वाढविण्याकरीता परिसरातील प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने आपली उपस्थिती दर्शवावी असे आव्हान आयोजन समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश संग्रामे, सचिव प्रा. ऋषीकात (रिंकू) पापडकर व समस्त आयोजन समिती आणि या बॅडमिंटन असोसिएशन गडचिरोली यांनी केले आहे.