गरंडा जि.प.शाळेत हसत – खेळत शिव चरित्र उपक्रमाची सांगता… — शिवरत्न पुरस्काराने विद्यार्थी सन्मानित…

कमलसिंह यादव 

  प्रतीनिधी

पारशिवनी

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथे वेध प्रतिष्ठान नागपूर द्वारा संचालित १९ फेब्रुवारी शिवजयंती ते १ मे महाराष्ट्र दिन या कालावधीत राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित हसत खेळत शिवचरित्र उपक्रमाची सांगता झाली.

वेध प्रतिष्ठान नागपूरचे सचिव खुशाल कापसे यांचे संकल्पनेतून साकारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित हसत खेळत शिवचरित्र हा दहा आठवड्याचा उपक्रम वर्ग दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शिव जयंतीच्या पर्वावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथे सुरू करण्यात आला होता. यामध्ये प्रत्येक आठवड्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित प्रश्नोत्तरे लेखन स्पर्धा, सामान्यज्ञान स्पर्धा, प्रश्नमंजुषा घेण्यात आली होती. या स्पर्धांमधून एकंदर गुणांच्या आधारावर वर्ग दुसरी मधून विवान क्षीरसागर, तिसरी मधून नैतिक धोटे, चौथी मधून सृष्टी धोटे व अनन्या कोहळे तर गावातील इतर मुलांमधून अथर्व गजभिये हे विद्यार्थी शिवरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले. महाराष्ट्र दिनाच्या प्रसंगी सरपंच चक्रधर महाजन, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गिरिधर धोटे, उपाध्यक्ष अश्विनी गजभिये,सदस्य राष्ट्रपाल मेश्राम, माया बोंबले, शारदा आपुरकर, आनंद चव्हाण, ग्रामसेवक ऋषिकेश चिंचुळकर, मुख्याध्यापक खुशाल कापसे, अंगणवाडी सेविका संघमित्रा शेंडे, स्वयंपाकी प्रिया मेश्राम यांचे हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.