गडचिरोली मुरूमगाव कोटगुल बस केव्हा धावणार?

धानोरा /भाविक करमनकर 

  स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले आणि शासनाने अमृत महोत्सव साजरा केला, गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रात आदिवासी जिल्हा समजला जातो , गडचिरोली वरून अंदाजे 100 किलोमीटर वर छत्तीसगड राज्याच्या सीमवर कोटगुल हे गाव वसलेली आहे आणि गावच्या परिसरात ३०- ४० लहान गाव वसलेले आहेत या गावात पोलीस मदत केंद्र शासकीय आश्रम शाळा व उपकेंद्र दवाखाना आहे तसेच ग्यारापत्ती या गावात सुध्दा पोलीस मदत केंद्र आहे, या परिसरातील जनतेला धानोरा – गडचिरोली ला ये -,जा करण्यासाठी अडचण होत असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस कोरोनाच्या काळापासून बंद करण्यात आले तेव्हापासून आजतागायत कायम कोटगुल बस बंद आहे यासाठी परिसरातील जनतेने अनेक वेळा बसची मागणी केली पण संबंधित विभागाने व राजकीय प्रतिनिधीनी कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही यावर जनतेमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. आता तरी बस सुरू होईल या प्रतीक्षेत नागरिक आशेने वाट पाहत आहे नागरिक महिला व विद्यार्थी यांना धानोरा तहसील कामासाठी तर गडचिरोली जिल्ह्याला जावे लागतात बस नसल्यामुळे लोकांना अडचण होत आहे .तरी गडचिरोली- मुरूमगाव — ग्यारापत्ती कोटगुल बस महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ कार्यालय गडचिरोली यांनी बस सुरू करावे अशी मागणी करण्यात येत आहे.