खल्लार हायस्कूल खल्लार येथे छंद शिबिराचा समारोप…

युवराज डोंगरे/खल्लार

           उपसंपादक

श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित असलेल्या खल्लार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय खल्लार येथे दि. 14/4 /2024 पासून ते दि.20/4/2024 पर्यंत चालणाऱ्या छंद शिबिराचा समारोप दि 21 एप्रिल रोजी संपन्न झाला.

           समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक, डी. आर. नवरे प्रमुख अतिथी योग प्रशिक्षक नितीन सिरस्कार, सौ.घोगरे मॅडम, सौ. कोकणेताई आदींची उपस्थिती होती.

            या शिबिरामध्ये 150 विद्यार्थी सहभागी झाले होते. या शिबिराकरिता अमोल मोपारी सौ.सव्वालाखे, अनिल बगाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले या शिबिराला प्राचार्य केशवरावजी गावंडे, कार्यकारिणी सदस्य,श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांनी शुभेच्छा दिल्यात मधुसूदनजी धाबे आजीवन सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती सुधाकररावजी जुनघरे,आजीवन सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

             या समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यु.डी. राणे यांनी केले तर आभार कु. चव्हाण मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.