सौ मंगलाताई निम्बोने सभापती पंचायत समिती यांचे पाठपुराव्याला यश.

कमलसिंह यादव 

   प्रतिनिधी

पारशिवनी :-दिंनाक ५/५/२०२३

पारशिवनी पंचायत समिती अंतर्गत कृषी विभागा तर्फे शेतकरी बांधवांना तात्काळ ७५ टक्के अनुदानावर ताळपंत्रीचे वाटप करण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान सौ. मंगलाताई उमराव निंबोने सभापती पंचायत समिती पारशिवनी यांनी केले आहे.

या अगोदर पंचायत समिती अंतर्गत शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर ताळपंत्रीचे वितरण करण्यात येत होते. पण सौ. मंगलाताई उमराव निंबोने सभापती पंचायत समिती पारशिवनी यांनी सेंस फंड योजने अंतर्गत कृषी विभागा मार्फत सर्वसाधारण शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर ताळपंत्रीचे वाटप करण्याबाबत सभापती सौ मंगलाताई निम्बोने यांनी पंचायत समिती सदस्य यांच्या सहकार्याने सदर योजनेकरिता भरीव तरतूद केली. या योजने अंतर्गत सन २०२२=२०२३ मध्ये ४६ शेतकरी बांधवांना लाभ दिला. आता २०२३=२०२४ मध्ये सुद्धा या योजने अंतर्गत ताडपत्री चा लाभ उपलब्ध करून देण्यात येत आहे.

तर मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी प्लास्टिक ताडपत्रीची योजना पंचायत समितीच्या समाजकल्याण विभागाच्या मार्फत १०० टक्के अनुदानावर येत असून त्यांचा सुध्दा लाभ अ. जाती. अ. जमातीच्या शेतकरी बांधवांनी घेण्याचे आवाहन सौ. मंगलाताई उमराव निंबोने सभापती पंचायत समिती पारशिवनी यांनी केले आहे.

पारशिवनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शासकीय योजनांचा लाभ लाभार्थी शेतकरी बांधवांना तात्काळ मिळावा यासाठी सौ. मंगलाताई उमराव निंबोने सभापती पंचायत समिती पारशिवनी ह्या वेळोवेळी पाठपुरावा करून योजना शेतकरी बांधवांना मिळवून देण्यासाठी एक पाऊल पुढे च असल्याने शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे. 

त्यांच प्रमाणे पंचायत समितीच्या माध्यमातून पशुसंवर्धन. समाज कल्याण. कृषी विभागाच्या अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच प्रमाणे घरकुल योजनेच्या माध्यमातून बेघर लोकांना घरकुलांचा लाभ मिळणार आहे. तरी लाभार्थ्यांना सभापती सौ मंगलाताई निम्बोने यांनी. आव्हान करून लोकांना लाभ घ्यावा असे आवाहन केले. 

 पहिला व महिन्याच्या शेवटच्या सोमवार ला तक्रार निवारण सभा होणार :- सभापती

सौ. मंगलाताई उमराव निंबोने सभापती पंचायत समिती पारशिवनी यांनी सांगीतले की महिन्याच्या पहिल्या व शेवटच्या सोमवार ला पंचायत समितीच्या सभागृहात लोकांच्या तक्रारी ऐकुन तात्काळ सोडविण्यासाठी तक्रार निवारण सभा आयोजित केली आहे. 

लाभार्थ्यांना पंचायत समितीच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ घेण्या करिता संबंधित अधिकारी सहकार्य करीत नसेल. किंवा आर्थिक लाभासाठी अडवनुक करीत असेल. किंवा लाभ देण्यासाठी विलंब करून मानसिक त्रास दिला जात असेल व त्यामुळे लाभार्थ्यांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत असेल. अश्या लाभार्थ्यांनी आपल्या तक्रारी महिन्याच्या पहिल्या सोमवार ला व शेवटच्या सोमवार ला सभापती तक्रार निवारण सभेत येऊन मांडाव्या असे आव्हान सभापती सौ मंगलाताई निम्बोने यांनी केले. 

तक्रार निवारण सभेला सभापती. उपसभापती. सदस्य. गटविकास अधिकारी. व सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.