पारशिवनी पोलिसाचा दहेगाव जोशी,माहुली चिचंभवन येथे रूट मार्च काढुन मतदाराशी शांततेत मतदान करण्याचे केले आव्हान…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी

       पारशिवनी:- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पर्वावर क्रिटीकल बुथ दहेगाव जोशी व चिचभवन येथे मतदान केन्द्रात भेट देऊन स्थानिक मतदारासोबत चर्चा केली व मतदान विषयी ठाणेदार यांनी मार्गदर्शन केले.

          तसेच शहरात व ग्रामिण भागात होणारे राम नवमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, ईद इत्यादि सण उत्सव शांततेत व सुव्यस्थेत पार पड़ावे करिता दी.3 मार्च ला पारशिवनी पोलिस विभागा तर्फे उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे नेत्तृत्वात पोलिस निरिक्षक व पोलिस उपनिरिक्षक व पोलिसांनी ग्रामिण भागातुन व शहरातून मुख्य मार्गावरुन रूट मार्च काढ़ला. 

        हा रूट मार्च पारशिवनी शहरातुन होत दहेगाव जोशी चिंचभवन , क्रिटीकल मतदान बुथ , माहुली , हेटीटोला या रस्त्यात येणारे गावाचे मार्गाने समोर रुटमार्च निघाला. 

         सदर रूट मार्च सहा. पोलिस अधीक्षक, उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे नेतृत्वात , पोलिस निरिक्षक याची प्रमुख उपस्थित मतदाराना मार्गदर्शनात करीत रूटमार्च काढण्यात् आला.  

          या रूट मार्च मध्ये पोलिस उपविभागीय अधिकारी याचे नेतृत्वात, पोलिस निरिक्षक यांचा प्रमुख उपस्थितीत सहायक पोलिस निरिक्षक अधिकारी, पोलिस हवालदार, अमलदार, पो स्टे व पारशिवनी येथील अधिकारी, अमलदार, आर पी एफ जवान, होमगार्ड होमसैनिक , हजर होते.