पोलिस स्टेशन येथे शांतता समिती,जेष्ठ नागरीक, महिला दक्षता समीतीची बैठक पोलिस निरिक्षक यांच्या अध्यक्षेत संपन्न.

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी 

         पारशिवनी:- पारशिवनी पोलिस स्टेशन येथे आज गुरुवार दि. 04-04-24 रोजी 11:00वा. ते 13:30 वा. दरम्यान पोलीस स्टेशन पारशिवनी हद्दीतील शांतता कमिटी, ज्येष्ठ नागरिक कमेटी,महिला दक्षता समिती व पोलीस पाटील यांची बैठक मिटींग घेण्यात आली.

          पोलिस स्टेशन येथे आयोजीत बेठेकित मीटींग मध्ये आगामी सण रामनवमी हनुमान जयंती डॉ. बाबासाहेव जयंती तसेच अन्य उत्सव शांततेत पार पाडणेबाबत मार्गदर्शक सूचना पोलिस निरिक्षक राजेश कुमार थोरात यांचे तर्फे देण्यात आल्या.

          तसेच आगामी लोकसभा निवडणुक संबधाने पोलिस स्टेशनचे पोलीस पाटील यांना त्यांचे कर्तव्य योग्य प्रकारे पार पाढावे तसेच कायदा व सुव्यस्था कशाप्रकारे अबाधित राहील या करीता मार्गदर्शन करण्यात आले.

          तसेच ज्येष्ठ नागरिक कमेटी आणी महिला दक्षता समिती ची यांच्या अडी अडचणी ऐकून घेऊन त्यावर योग्य मार्गदर्शन पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात ठाणेदार पोलीस स्टेशन पारशिवनी नी केले. कार्यकमात गावातील प्रतिष्ठित नागरिक ,व्यापारी , पत्रकार , दक्षता समिती ची महीला, पोलिस पाटील तसेच गावातील गणमान्य नागरिक शातंता समीतीच्या बैठकित उपस्थित होते.