रोहित जावळे मुख्य शेतकरी यांनी ग्रामदैवत पिरसाहेब यांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शनाचा लाभ घेऊन आशीर्वाद घेतला…

 बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

         पिंपरी बुद्रुक गावचे ग्रामदैवत पिरसाहेब यांच्या यात्रे निमित्त दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे मुख्य शेतकी अधिकारी रोहित जावळे सह इतर सर्व कारखान्याचे पदाधिकारी यांनी आपल्या उपस्थितीत पिंपरी बुद्रुक येथील पिरसाहेब यात्रेनिमित्त भेट देऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले.

         याप्रसंगी शेतकी अधिकारी रोहित जावळे बोलत असताना म्हणाले की,, पिर साहेब बाबा माझा शेतकरी राजा सुखी राहू दे चालू वर्षी चांगला पाऊस येऊ दे, बळीराजाची शेती चांगली पिकू दे शेतीमालाला भाव येऊ दे गोर गरीबबांच्या हाताला कामे मिळू दे पिरसाहेब बाबांच्या दर्शना प्रसंगी रोहित जावळे यांचे उद्गार.

            उपस्थित पदाधिकारी यांचा देवस्थानचे पुजारी नबीलाल शेख यांच्या हस्ते शेतकी अधिकारी रोहित जावळे सहित इतर पदाधिकाऱ्यांचाही सन्मान केला. 

        या प्रसंगी, पिंपरी बुद्रुक येथील वाहान मालक व प्रगतशील बागायतदार नबीलाल शेख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली व भेटी प्रसंगी सर्वच अधिकारी व ग्रामस्थांच्या समवेत स्नेहभोजनचा आस्वाद घेतला.

             यानिमित्त रोहित जावळे मुख्य शेतकी अधिकारी, विफुल एकतपुरे, सतीश रत्नाकर गिरमे, संतोष कुलकर्णी ओरसिल, परेश मामा बोरावके नितीन रडे, शंकर शिंदे इंडस्ट्रीजचे मालक, नामदेव बोडके भागवत शेंडगे व नबीलाल शेख यांचा परिवार सियान शेख, अशरफ शेख, बाळासाहेब शेख,पिरकन शेख, सहित गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.