उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकी धडकली,दोघांचा मृत्यू.. — जखमीला उपचारासाठी नागपूरला केले रेफर..

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

 

पारशिवनी :- पारशिवनी पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या आमडी नायकुड रोडवर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून दुचाकीस्वार चालकाने धडक दिली.

          अत्याधिक रक्तस्रावामुळे दोघांचा घटनास्थळावर मृत्यू झाला. तर 13 वर्षाच्या मुलाला उपचारासाठी नागपूरला रेफर केले.

        मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 9.00 वाजेच्या दरम्यान तिघे ही दुचाकीवरून रामटेक येथून सालई मेटा येथे जात असताना सूतगिरणी कंपनीजवळ उभा केलेला ट्रक अंधारात दिसत नसल्याने दुचाकी पाठीमागील बाजूस जाऊन आदळल्याने दुचाकीचालक जागीच ठार झाला.

          मागे बसलेली व्यक्ती. १) उमराव पुनाराम  मडावी, वय 59 वर्ष रा. नायकुड, २)  बंडु उर्फ रामकृष्ण पाडुरंग भलावी, वय 56 वर्ष रा. पेठ परसोडी (पारशिवनी) यांचा दोघाचे अतिरक्तस्रावामुळे जागीच मृत्यू झाला तर जखमी बालक रोहन रमेश मलघाम वय 13 वर्ष रा नयाकुंड यास नागपुर येथे उपचार हेतु रेफर करण्यात आले.

        पारशिवनी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.दोन्ही मृतांना शवविच्छेदनासाठी पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात पाठवले तर जखमींला नागपूरला पाठविल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

       तक्रारदार आशिष उमराव मडावी वय 30 वर्ष नयाकुंड यांच्या तक्रारी वरून पाराशिवनी पोलीस अधिक तपास करत आहेत.