स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांची धड़क कारवाही.. — मौजा मांडगाव येथून कारसह देशी दारू जप्त.. — 4 लाख,40 हजार,50 हजार रुपयाचा मुद्देमाल..

  सैय्यद ज़ाकिर

जिल्हा प्रतिनिधी वर्धा

वर्धा :– समुद्रपूर तालुक्यातील मौजा मांडगाव येथील इसम हा स्वतःच्या घरी दारु आणत असल्याची गुप्त माहिती वर्धा येथील गुन्हे शाखेला मिळाली होती.यावरुन त्यांनी नाकाबंदी करून सदर अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या इसमाला चारचाकी वाहन व दारुसह अटक करण्यात आली.

          3 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखा,वर्धा येथील पथकाला गुप्त माहिती मिळाली कि आरोपी प्रवीण शंकर जोगे रा,मांडगाव ता,समुद्रपुर,अक्षय रामेश्वर पोहाने रा,धोत्रा ता,जिल्हा वर्धा हे आपल्या मारुती सुझुकी कार क्र.एम.एच. 04,एफ.झेड. 6916,मध्ये अवैध रित्या विना पास परवाना देशी दारू मांडगाव येथे प्रवीण जोगे यांच्या घरी आणणार आहेत.

         माहिती वरुन त्यांच्यावर पाडत ठेवून नाकेबंदी अंतर्गत दारुबन्दी प्रो,रेड केला असता आरोपी 1) प्रवीण शंकर जोगे वय 33 वर्ष रा.मांडगाव,ता.समुद्रपुर,2) अक्षय रामेश्वर पोहाने 28 वर्ष रा.धोत्रा,ता,जिल्हा वर्धा यांच्या ताब्यातील देशी दारुचे भरलेल्या 180 एम.एल.च्या सील बंद शिशा प्रति 150 रु/प्रमाणे 11 हजार,250 /रु व देशी दारू ने भरलेल्या 90 एम.एल.च्या 288 सीलबंद शिशा प्रति 100 रु/प्रमाणे 28 हजार,800 /रुपये तसेच एम.एच. 04,एफ.क्रमांकची मारुती सुझुकी गाडी किंमत 4 लाख 40 हजार,050/रुपयेचा माल जप्त करुन आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

       सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.सागर कवड़े यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड़ यांचे निर्देशात पोलीस अमलदार सचिन इंगोले,रामकिशन इप्पर,अरविंद इंगोले,सर्व नेमनुक स्थानिक गुन्हे शाखा ,वर्धा यांनी केली आहे.