गंगाई बहुद्देशीय संस्था हिंगणघाट, तर्फे ग्रामपंचायत आजंती येथे माता सावित्रीमाई फुले जयंती साजरी….

 प्रितम जनबंधू

        संपादक 

                   गंगाई बहुद्देशीय संस्था हिंगणघाट, जि.वर्धा तर्फे ग्रामपंचायत आजंती येथे माता सावित्रीमाई फुले जयंती साजरी करण्यात आली.

           सावित्रीमाई जोतीराव फुले या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीमाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. 

              सावित्रीमाई आणि त्यांचे पती ज्योतिराव हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. या दोघांनी इ.स. १८४८ मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.

              महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीमाई फुले ओळखल्या जातात. जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. त्या एक लेखिका देखील होत्या. त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले आहे. १८९७ मध्ये प्लेगची साथ आल्यावर त्यांनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केले. या प्रक्रियेत सावित्रीमाई फुले यांना देखील प्लेगची लागण झाली. १० मार्च १८९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला. असा परीचय देत सावित्रीमाई यांची कर्तुत्वशील यशोगाथा संस्था उपाध्यक्षा श्रीमती मंगला लोखंडे यांनी विस्तृत मार्गदर्शन करीत उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना सांगीतली.

        श्रीमती वर्षा मानकर यांनी सावित्रीमाईंच्या जीवनावर आधारित गीत सादर केले.

                    कार्यक्रमाला आशा वर्कर सुशिला निमसरकार, देवढे मॅडम, कोल्हे बाई, गलांडे मॅडम व इतर गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.