चुलत भावाला डोक्यात आणि उजव्या पायावर लोखंडी राॅडनमारून केले जखमी… — येवदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

 युवराज डोंगरे/खल्लार 

           उपसंपादक

           कोणतेही कारण नसताना चुलत भावाच्या डोक्यात व उजव्या पायावर लोखंडी रॉडने मारहाण करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना दर्यापूर तालुक्यातील भामोद येथे सोमवार दिनांक १ एप्रिल दुपारच्या च्या सुमारास घडली आहे.

            पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष खडे (वय ३६ राहणार भामोद ) हे दिनांक १ एप्रिल रोजी दुपारच्या तीन च्या सुमारास भामोद येथे आपल्या राहत्या घरात बसलेले असताना त्यांचा चुलत भाऊ संतोष खडे (वय २६) याने काहीही कारण नसताना पाठीमागून येऊन चुलत भाऊ संतोष शंकर खडे यांच्या डोक्यात व उजव्या पायावर लोखंडी रॉडने मारहाण करून तसेच डोक्याला व उजव्या पायाला दुखापत केली व ठार मारण्याची धमकी दिली.

          या मारहाणीत जखमी झालेल्या संतोष खडे यांना प्रथम प्राथमिक ग्रामीण रुग्णालयात दर्यापूर येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात अमरावती दाखल करण्यात आले होते. परंतु संतोष खडे यांना डोक्याला मार जास्त लागल्यामुळे त्यांना या ठिकाणी उपचार त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

           संतोष खडे यांच्या पत्नी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार येवदा पोलिसांनी त्यांचा चुलत भाऊ अजय नारायण खडे व काका नारायण खडे यांच्यावर भा.द.वि. कलम ३२४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास येवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार व बिट जमादार विठ्ठल मुंडे हे करत आहेत.