ब्रेकिंग न्यूज… — वनविभागाच्या ट्रॅप कॅमेराद्वारे चोरांचा शोध…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी

              सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र पाथरी अंतर्गत नियतक्षेत्र मेहा येथील गावकऱ्यांच्या सोयीकरिता व मागणीनुसार श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना अंतर्गत वन विभागातर्फे सोलर बोर लावण्यात आलेली होती. सदरच्या बोरवेलचा संपूर्ण गावकरी पाणीटंचाईच्या काळात पाण्याचा उपयोग घेत होते. 

            वनरक्षक संदीप चौधरी हे वनगस्त करीत असताना सोलर बोरवेल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात आली होती. त्यानंतर दिनांक १६.०३. २०२४ पोलीस स्टेशन पाथरी येते अज्ञात इसमाने वनविभागाच्या मालकीची सोलर बोरवेल चोरून नेल्याबाबतची तक्रार नोंदविण्यात आली होती.

            वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात सोलर बोरवेल चोरी करतानाचे फोटो ट्रॅप झाले. त्याआधारे वनविभागाने कसून चौकशी केली व आज रोजी दिनांक ०२/०४/२०२४ चोरी केलेल्या मुद्देमालासह आरोपीस ताब्यात घेतले.

              सदरची कारवाई श्री प्रशांत खाडे विभागीय वन अधिकारी चंद्रपूर, श्री घनश्याम नायगमकर सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर, यांचे मार्गदर्शनात श्री विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली श्री एन. बी. पाटील वनक्षेत्र सहाय्यक पाथरी व श्री संदीप चौधरी वनरक्षक मेहा यांनी संपूर्ण कारवाई केली. सदर प्रकरणी श्री श्रीराम आदे वनरक्षक गेवरा, श्री खेमराज गोडसेलवार वनरक्षक पाथरी, कु. कल्याणी पाल, वनरक्षक खानाबाद, कु. यामिना पोईनकर वनरक्षक पालेबारसा, श्री अतीन मानकर यांनी मोलाचे सहकार्य केले असुन पुढील तपासाकरिता पोलीस स्टेशन पाथरी यांच्या ताब्यात दिले.