‘आप’चे राज्यसभा खासदार संजय सिंग यांना जामीन मंजूर..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

              वृत्त संपादीका

          मद्य धोरण प्रकरणी अटकेत असलेले आपचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे.जामीन मंजूरीला ईडीने विरोध दर्शविला नाही.

     आप’चे खासदार संजय सिंग यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.आम आदमी पक्षाला हा दिलासा समजला जातोय. जामिनासाठी ईडीने कसल्याचं प्रकारचा विरोध केला नसल्याने कोर्टाने जामीन मंजूर केला.

        सन 2021-22 च्या दिल्लीच्या अबकारी धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या चौकशीसंदर्भात राज्यसभा खासदार संजय सिंग यांना ऑक्टोबर २०२३ मध्ये ईडीनं अटक केली.माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यानंतर आता या प्रकरणाशी संबंधित प्रकरणात संजय सिंगांना अटक झाली होती.

      सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती संजीव खन्ना,न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती पीबी वराळे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.खंडपीठाने ईडीला विचारले होते की,संजय सिंह यांना अजूनही तुरुंगात ठेवण्याची गरज का आहे?

     संजय सिंग यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की,मनी लाँड्रिंगची पुष्टी झालेली नाही आणि मनी ट्रेल देखील सापडलेला नाही.असे असतानाही संजय सिंह ६ महिन्यांपासून तुरुंगात आहेत. 

        अखेर मंगळवारी ईडीने त्यांच्या जामिनाला कोणताही आक्षेप घेतला नाही.त्यामुळे संजय सिंगांना जामीन मंजूर झाला.