संस्कार आणि जीवनमूल्ये जपण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाईचा आदर्श महत्वाचा – प्रकाश मेश्राम (अध्यक्ष मूकनायक फाऊंडेशन)

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

            वृत्त संपादीका 

         चिमूर तालुक्यातील खापरी धर्मु येथे बौध्द पंच कमेटीच्या वतीने ३ जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

           या कार्यक्रमा प्रसंगी मार्गदर्शन करताना लोककलावंत प्रबोधनकार तथा समाजसेवक प्रकाश मेश्राम यांनी म्हटले की,संस्कार हा सर्वात मोठा दागिना आहे.म्हणूनच आपण आयुष्यात आपल्या पाल्याकरिता संपत्ती पेक्षा मनात संस्कार रुजवा,तेव्हा आदर्श पिढी निर्माण करू शकतो.

          याचबरोबर कार्यक्रमाचे प्रस्तावीक करीत असताना मूकनायक फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रकाश मेश्राम हे विविध कर्तव्य व गुणधर्माकडे लक्ष वेधत होते.

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रेया शेंडे सरपंच ग्रा.प.खापरी (धर्मु),तर प्रमुख पाहुणे म्हणून विचार मंचावर प्रा. डॉ नरेंद्र मेश्राम,अतिथी जनार्धन खोब्रागडे सर भारतीय बौध्द महासभा माजी अध्यक्ष नागपूर,अरविंदजी रामटेके से.नि. शिक्षक चिमूर,पो.पा.अंजली मेश्राम,प्रा.डॉ.मिलमिले सर आठवले कॉलेज चिमूर,प्रा. दिवाकर कुंभरे सर आठवले कॉलेज चिमूर,पिसे मॅडम मुख्यद्यपिका जी.प.खापरी धर्मु,गभने मॅडम सहायक शिक्षिका जी.प.खापरी धर्मु,से.नी. अंगणवाडी शिक्षिका मेश्राम मॅडम,ग्रं.प.सदस्या रामटेके मॅडम उपस्थित होते.

        मान्यवर पाहुण्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर उजाळा टाकला.

           पुढे प्रकाश मेश्राम यांनी स्री ही समाजाचा अलंकार आहे आणि स्त्रीचा सन्मान करणे ही प्रत्येक पुरुषाची जबाब दारी आहे असे सांगितले.

       प्रा.नरेन मेश्राम सर यांनी स्त्रि उपभोगाची जननी नसून प्रथम महिला शिक्षिका आहे आणि ती आपले कुटुंब उत्तम रित्या सांभाळू शकते.तद्वतच अनिष्ठ रूढी परंपरा यावर सडकून आपले मत प्रखरपणे मांडले.

          अरविंद रामटेके सर यांनी स्त्री ही अबला नसून सबला आहे. “मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी,”यावर आपले मत व्यक्त केले. 

        कार्यक्रमाची सुरवात महात्मा फुले,छत्रपती शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,रमाई,सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन व पुष्पमाला अर्पण करुन करण्यात आली.

       सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश मेश्राम यांनी तर सूत्र संचालन व आभार सौ. नीता प्रकाश मेश्राम यांनी केले.

             क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला गावातील दोनशे स्त्री-पुरुष उपस्थित होते,कार्यक्रमाचा समारोप शाळेतील विद्यार्थ्यांना बुक व पेन वाटप करून करण्यात आला.

           कार्यक्रम यशस्वी करिता उपासक,उपसिका यांनी परिश्रम घेतले.