रूढी परंपरेची बंधने झुगारून महिलांनी पुढे यावे.:- अनिल किरणापुरे..  — क्रांतीज्योती सावित्रीआई फुले जयंती कार्यक्रमाचे औचित्य. 

 संजय टेंभूर्णे

कार्यकारी संपादक

दखल न्युज भारत.. 

       मौजा रेंगेपार येथे ज्योतिराव माळी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्री आई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

            कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्येक्रमाचे अध्यक्ष अनिल भाऊ किरणपूरे पं स सदस्य तथा तालूका अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.पूजताई देशमुख सरपंच जमनापूर,माधुरीताई कटरे सरपंच खांबा /रेंगेपार,शैलेश जी गजभिये संचालक कृ. उ. बाजार समिती लाखनी,साखरे सर नाशिकराव विध्यालाय सातलवाडा,सौ. शिलताई बिसेन सदस्य ग्रा.पं खांबा,उमेश जी देशमुख जमनापूर,केवळरामजी बोपचे पो. पा. रेंगेपार,संजयजी पटले उपसरपंच खांबा /रेंगेपार,शैलेशजी गणवीर किन्ही,नितीनजी वासनिक उपसरपंच खांबा /रेंगेपार,नंदेश्वर मॅडम किन्ही,पूजा ताई बिसेन रेंगेपार,दिलीप उंदीरवाडे, हे प्रामुख्याने उपस्थित होते.

       कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेवकराम खैरे,रवी कावळे,पंकज माने,ईश्वरदास टिकेकर,मुनेश्वरी टिकेकर,राणी कावळे,मनीषा माने,वर्षा पाचे,एम.पि.बनकर सर खांबा यांनी सहकार्य केले.

         अध्यक्षीय भाषणात अनिल किरणापुरे म्हणाले की इतिहासात अनेक रणरागिनी होऊन गेल्या आहेत.त्याचा आदर्श आपण स्वीकारला पाहिजे,जुन्या अनिष्ठ, रूढी-परंपरा,चाली,बंधने,झुंगारून विज्ञानाची कास धरली पाहिजे.

        आपले मुलं नाचणारी करण्यापेक्षा वाचणारी केली पाहिजेत,तेव्हाच समाजात क्रांती घडवून येईल.मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.कर्ज काढून सण तौव्हार साजरे करू नका,मात्र मुलांचे शिक्षण पुर्ण करा.

        महापुरुषांचा आदर्श घेऊन त्यांच्यावर संस्कार रुजवले पाहिजे,समाजात काम करताना महिलांनी सावित्री आईच्या विचारांना सामोरे ठेवून काम केलं पाहिजे,महिलांचे परिवर्तन झाल्याशिवाय शंभर टक्के समाजाचे परिवर्तन होणार नाही.

         शिवाजी घडवण्यासाठी आधी जिजाबाई घडली पाहिजे असे ते बोलत होते.

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार ए.पी.बनकर सर यांनी केले आणि प्रास्ताविक नितीन वासनीक यांनी केले.