आरमोरी येथे ७ जानेवारी रोजी, भिमा कोरेगांव शौर्य दिवस, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद संयुक्त जयंती सोहळा… — डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंच आरमोरी व्दारा प्रबोधनकार प्रशांत नारनवरे व संच नागपूर यांचा “वैचारिक वादळ” प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन…

प्रितम जनबंधु

     संपादक 

             भिमा कोरेगांव शौर्य दिवस, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती, राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद यांचा संयुक्त जयंती सोहळ्याचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंच आरमोरी व्दारा प्रबोधनकार प्रशांत नारनवरे व संच नागपूर यांचा “वैचारिक वादळ” प्रबोधनात्मक कार्यक्रम रविवार, दिनांक ०७ जानेवारी २०२४ ला सायं. ५.०० वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आरमोरीच्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात येत आहे. तरी सदर प्रबोधनात्मक कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहुन आस्वाद घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढविण्यास सहकार्य करावे असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंच आरमोरीच्या वतीने करण्यात आले आहे.

             उद्घाटन सोहळ्याचे समारंभाध्यक्ष – जयकुमार मेश्राम सामाजिक कार्यकर्ते आरमोरी असणार आहेत तर उपाध्यक्ष – सचिनभाऊ खोब्रागडे प्राचार्य, किशनराव खोब्रागडे महाविद्यालय वैरागड हे असणार आहेत.

                            

              उध्दघाटक  म्हणून अहेरीचे पोलिस निरीक्षक मनोज  काळबांडे असणार आहेत तर, सहउद्द्घाटक – प्रशांत मेश्राम सचिव प्रेरणा ऐज्युकेशन सोसायटी वडसा हे असणार आहेत.

              स्वागताध्यक्ष – जगदिश दामले कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंच आरमोरी, प्रमुख वक्ते – आशिष फुलझेले सामाजिक विचारवंत नागपूर असणार आहेत.

           सत्कारमूर्ती प्रा. डॉ. भूषण महादेव रामटेके आंबेडकरी कवी आणि लेखक तसेच प्राचार्य पाटणी महाविद्यालय पुलगांव, जि. वर्धा तसेच वासुदेवजी अंबादे सामाजिक कार्यकर्ते आरमोरी, विशेष अतिथी म्हणुन  संदिप मंडलिक  पोलीस निरीक्षक आरमोरी, अविनाश मेश्राम वनपरिक्षेत्र अधिकारी आरमोरी, डॉ. मसराम आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन आरमोरी, भिमराव पात्रीकर सामाजिक कार्यकर्ते इंजेवारी, खिरेंद्र बांबोळे प्रियदर्शी सम्राट अशोक फोरम आरमोरी, यशवंत जांभुळकर अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आरमोरी,अजय गेडाम सामाजिक कार्यकर्ते आरमोरी, हाजी लतीफ अबुबकर देरडीवाला मुस्लिम संघटना आरमोरी,भगवान बन्सोड पत्रकार आरमोरी,रंजीत बनकर अध्यक्ष माळी समाज संघटना आरमोरी, राजु वादीकर अध्यक्ष चर्मकार संघटना आरमोरी, राहुल जुआरे युवारंग आरमोरी, चेतन भोयर ओ.बी.सी. महासंघ आरमोरी, मोरेश्वर टेंभुणे सावकार आरमोरी, सौ. वेणुताई ढवगाये सामाजिक कार्यकर्त्या आरमोरी, सौ. भारती मेश्राम सामाजिक कार्यकर्त्या आरमोरी यांच्या प्रमुख उपस्थितीत वैचारीक वादळ प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

        सदर कार्यक्रम उभारण्यात प्रियदर्शी सम्राट अशोक सोशल फोरम आरमोरी, आदिवासी एम्प्लाईज फेडरेशन आरमोरी, माळी समाज संघटना आरमोरी, चर्मकार समाज मंडळ आरमोरी, ओ.बी.सी. महासंघ शाखा आरमोरी, मस्लिम संघटना आरमोरी आदी सामाजिक संघटनांचे विषेश सहकार्य लाभले आहे.