राजाराम केंद्र शाळेत शाळा समिती गठीत…

रोशन कंबगौनीवार 

       प्रतिनिधी

         राजाराम:- अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद केंद्र शाळा राजाराम येथे काल दिनांक ४ जानेवारी रोजी ग्राम पंचायत राजाराम चे उपसरपंच रोशन कंबगौनीवार यांच्या अध्यक्षतेखाली शाळा समिती गठीत कार्यक्रम आयोजित केले होते.

        शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष अरविंद परकिवार, उपाध्यक्ष मनोज सिडाम, सदस्य जितेंद्र गड्डमवार, जितेंद्र पंजलवार, ममता सिडाम, मिनाक्षी सडमेक, यांची निवड करण्यात आले आहे.

         कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक अजय पस्पूनरवार तर प्रस्ताविक केंद्रप्रमुख विनोद पुसलवार आभार प्रदर्शन जि. के. मडावी यांनी मानले.

          यावेळी संजय लग्गावार,मधूकर गोंगले, केवल गड्डमवार, नरेन्द्र शालीग्राम, सुधीर बोडगेलवार,नितीन मोतकुरवार,राकेश सडमके,दिवाकर आत्राम,व्यंकटेश नैताम,तिरुपती दुर्गे, साईनाथ दुर्गे, रोहिदास सोयाम,योगेश आलाम, विट्टल बामनकर, भीमराव गोंगले,प्रभाकर वेलादी आदी पालक वर्ग उपस्थित होते.