नवजीवन (सी.बी.एस.ई) मध्ये उन्हाळी शिबीराचे आयोजन…. — शारिरीक विकासासाठी उन्हाळी शिबीर आवश्यक प्राचार्य मुजम्मिल सय्यद….

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

          साकोली -नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय स्कूल (सीबीएस साकोली येथे १२ दिवसीय उन्हाळी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या उदघाटनीय कार्यक्रमाचे उदघाटक प्राचार्य मुजम्मिल सय्यद, पर्यवेक्षिका शर्मिला कछवाह, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी विनोद किरपान व शिबीर प्रमुख सतिश गोटेफोडे उपस्थित होते.

        विद्यार्थ्याच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक तसेच सर्वागीण विकासाकरिता उन्हाळी शिबीर अत्यंत आवश्यक असून स्पर्धेत टिकणारे विद्यार्थी यातून तयार होणार, तसेच इच्छाशक्ती असेल तर विद्यार्थी हा प्रत्येक स्पर्धेत टिकेल व शाळेचे नाव मोठे करेल व हे सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी उन्हाळी शिबीर उपयुक्त ठरणार आहे असे प्रतिपादन प्राचार्य मुजम्मिल सय्यद यांनी केले. शिबीर प्रमुख सतिश गोटेफोडे यांनी शिबीरातील सर्व उपक्रमाविषयी विस्तृत माहिती दिली. तसेच या उन्हाळी शिबीरातील प्रत्येक उपक्रम हा विद्यार्थ्यांच्या भविष्यातील प्रवासात उपयोगी येणार आहे असे सांगितले.

        या उन्हाळी शिबीरामध्ये योगा, कराटे, डॉज बॉल, वूड बॉल, थ्रो बॉल, व्हॉली बॉल, आर्चेरी, एअर रायफल शुटींग, भाला फेक, थाली फेक, शास्त्रीय नृत्य, चित्रकला, लहान मुलांसाठी विविध मैदानी खेळ या सारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे संचालन सरताज साखरे व आभार रोझी पठान यांनी केले. उन्हाळी शिबीराकरिता सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.