अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यांमध्ये दहा दिवसीय धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिर… — ५ मे २३ रोजी होणार सार्वत्रिक समारोपीय समारंभ…

रत्नदिप तंतरपाळे/चांदूर बाजार तालूका प्रतिनिधी

             अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका यांच्या मागणीप्रमाणे अचलपूर व चांदूरबाजार तालुका भारतीय बौद्ध महासभा द्वारा अचलपूर तालुक्यातील १० गावात व चांदूर बाजार तालुक्यातील ७ गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध जयंती निमित्त २६/४/२३ ते ५/५/२३ या कालावधीत दहा दिवसाचा प्रशिक्षण शिबिरे राबविण्यात येत आहेत. सदर सर्व शिबिरांचे उद्घाटन त्या त्या गावातील बौद्ध विहारात २६/४/२३ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले आहे.

        सदर १० दिवसीय प्रशिक्षण शिबिरांसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय प्रशिक्षण विभागाने प्रत्येक गावासाठी एक याप्रमाणे एकूण १७ केंद्रीय शिक्षिका नेमून दिल्या आहेत दिनांक २६/४/२३ रोजी सर्वच गावात भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी सदर प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन केले आहे.

         अचलपूर तालुक्यातील ग्राम रामापुर, मेघनाथपूर, जवर्डी, शिंदे बु-१, सिंधी बु-२, पथ्रोट, विद्यानगर कांडली, पोही, वडनेर भुजंग, रवी नगर परतवाडा, येथे अनुक्रमे सरस्वती ताई काशीद औरंगाबाद, मालाताई बर्डे नागपूर, अलकाताई दीपंकर मुंबई, करुणाताई नरवडे जळगाव, सुजाताताई सोनवणे मुंबई, सुजाताई पटाईत नाशिक, कौशिकताई मेश्राम चंद्रपूर, सुमित्राताई सरवटकर जळगाव, शालिनीताई धनराज नाशिक, शांताबाई भालेराव नाशिक या केंद्रीय शिक्षिका आहेत.तर चांदूर बाजार तालुक्यातील ग्राम वणी, बेलखेडा, सुरळी, अलीपुर, चिंचोली, सोनोरी, ब्राह्मणवाडा पाठक या सात गावात अनुक्रमे प्रज्ञाताई इंगळे अकोला संघमित्राताई आठवले अमरावती प्रतिभाताई ढोंडरी धुळे संध्याकाळी कांबळे मुंबई सरस्वती ताई साबळे बुलढाणा लक्ष्मीताई सराटे अमरावती नलिनीताई थोरात यवतमाळ या केंद्रीय शिक्षिका मार्गदर्शन करीत आहेत.

           या दहा दिवसात एकूण १७ विषयांवर सर्वच गावात चर्चा, संवाद, विचारमंथन व मार्गदर्शन केंद्र करण्यात येणार आहे. प्रामुख्याने त्रिसरण व पंचशील, बौद्ध धम्मात पूजेचे महत्व, तथागत भगवान गौतम बुद्ध चरित्र,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, बौद्धांची सण व मंगल दिन,बौद्धांची पवित्र स्थळे,अंधश्रद्धा व बुवाबाजी, धम्म अधम्म सधम्म, दहापारमिता, अनिष्ट रूढी व परंपरा, माता रमाईचा त्याग व कार्य, भारतीय बौद्ध महासभा स्थापनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्देश, संस्थेची व्याप्ती व कार्य आदी विषयांवर संवाद व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

             दोन्ही तालुक्यातील या धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचा भव्यसमारोप समारंभ बुद्ध जयंतीदिनी शुक्रवार दि.५ मे २३ रोजी संपन्न होणार आहे. अचलपूर तालुक्यातील दहा गावातील धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचा समारोप समारंभ कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह अचलपूर येथे शुक्रवार दिनांक ५ मे २३ रोजी सकाळी ११:०० वाजता संपन्न होणार आहे. तर चांदूरबाजार तालुक्यातील ७ गावातील धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचा एकत्रित समारोप समारंभ शुक्रवार दि. ५ मे २३ रोजी सायं. ५:३० वाजता भूमिपुत्र बुद्ध विहार ब्राह्मणवाडा पाठक येथे संपन्न होणार आहे. या दोन्ही ठिकाणचा समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी अमरावती जिल्हा (पश्चिम) जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. मुकेश सरदार सर हे राहणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राज्य सरचिटणीस सुशील वाघमारे मुंबई व भारतीय बौद्ध महासभा राज्य शाखेचे विभागीय सचिव विजयकुमार चोर पगार हे उपस्थित राहणार आहेत प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा पूर्व चे जिल्हा अध्यक्ष विलासराव मोहाडी अमरावती जिल्हा पश्चिमचे सरचिटणीस सतीश इंगोले जिल्हा कोषाध्यक्ष एम पी नितळे व अन्य जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

        सदर धम्म विषयक प्रशिक्षण शिबिराचा लाभ अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिका यांनी घेऊन धम्म चळवळ गतिमान करावी असे आव्हान वजा विनंती जे.बी. गायकवाड, संजय शिंगाडे, निर्मलाताई नागले, संगीताताई सरदार, प्रमिलाताई डांगे, आशाताई इंगळे, प्रमोद खाडे, बाळासाहेब डोके, देवराव चक्रे, नंदाभाऊ कौतिककर, पूनमताई खंडारे, आशाताई इंगळे, विनोद सदाशिव,वंदनाताई इंगळे,

       पवन मनोहरे, योगेश तानोलकर,अमरदीप गवई, राजकुमार खंडारे, दिपालीताई खंडारे, उमाताई वानखडे, अरुणभाऊ तेलमोरे, स्वप्नील वानखडे,बुद्धभूषण तागडे, सचिन तायडे आदींनी केलेली आहे.