नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
इंदापूर महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त इंदापूर येथील प्रशासकीय भवन येथील मैदानावर आज सकाळी मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ झाला. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, सहाय्यक गट विकास अधिकारी राम शिंदे, इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्यासह माजी नगराध्यक्ष अंकिता शहा, मुकुंद शहा, अतुल झगडे, पोपट शिंदे, मारुती मारकड, मेजर कैलास गवळी,श्रीधर बाब्रस, अनिकेत वाघ यांच्यासह अधिकारी- शिक्षक कर्मचारी नागरिक उपस्थित होते.
प्रारंभी पोलिस दल व नारायणदास रामदास हायस्कूल येथील विद्यार्थी यांच्या बॅण्डने राष्ट्रगीत व राज्यगीत गायले. यावेळी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने प्रशासनातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून सहकार कृषी क्रीडा अशा विविध विभागात राज्याने प्रगती केली आहे. महाराष्ट्र हे विकसित राज्य असून भविष्यात अधिक गतीने राज्य प्रगतीपथावर जाईल.